शिक्षण

कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी या प्रश्नांची उत्तरे शोधा

Important College Admission Guidelines | Aapli Mayboli
लगेचचं हुरळून जाऊ नका

कॉलेजच्या गुळगुळीत ब्रोशरवर बर्‍याच गोष्टी लिहिलेल्या असतात. जमाना पॅकेजिंगचा आहे आणि शिक्षण क्षेत्रानं एज्युकेशन इंडस्ट्री होण्यापर्यंतची मजल मारली आहे. त्यामुळे कॉलेजच्या माहिती पुस्तकात लिहिलेलं सारंच कॉलेजमध्ये असेल आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण खरंच त्या कॉलेजमध्ये मिळत असेल असं वाटून हुरळून जाण्यात काहीच अर्थ नसतो.

हेही वाचाएक पाऊल स्वप्नांच्या दिशेनं

फसवणूक होत असेल तर गप्प बसू नका

विशेषत: खाजगी कॉलेज आणि नव्यानं सुरू झालेल्या अनेक कॉलेजमध्ये अशी फसवणूक होण्याच्या तक्रारी मुलं करतात. पण वर्ष वाया जाईल या भीतीने गप्प बसतात. पुढे फसवणूक होण्यापेक्षा आणि सरसकट शिक्षण व्यवस्थेलाच शिव्या घालण्यापेक्षा आपणच काही अत्यंत सामान्य गोष्टी केल्या तर आपली फसवणूक तरी आपण टाळू शकतो.

योग्य ती खबरदारी घ्या

मुख्यत: प्रोफेशनल कोर्सेससाठी आपण अमूक एक कॉलेजात प्रवेश घेणार असू तर ही खबरदारी घ्यायलाच हवी. इंजिनिअर व्हायचं असेल, मीडियाबाबतचं शिक्षण घ्यायचं असेल किंवा अगदी फॅशन डिझाईनिंगमध्ये करिअर करायचं असेल तरीही लहान मोठ्या शहरातून त्यासाठी अगणित कॉलेजेस आहेत. पण त्या ढीगभर कॉलेजेसमधली सगळीच कॉलेजं काही दर्जात्मक पातळीवर सिद्ध झालेली असतात असं नाही.

खात्री करा आणि मगच निर्णय घ्या

अनेकदा तर कॉलेजला मान्यताही मिळालेली नसते. अशावेळी अव्वाच्या सव्वा फी घेऊन निरनिराळे कोर्सेस चालवले जातात आणि त्यात अनेक विद्यार्थी फसतात. ऐन परीक्षेच्या काळात संस्थेला टाळे लागल्याच्या घटना अलीकडेच उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे आपण व्यावसायिक अभ्यासक्रम निवडताना अत्यंत सामान्य पण तितक्याच महत्त्वाच्या काही गोष्टी तपासून पहायलाच हव्यात.

हेही वाचाशैक्षणिक कर्ज व संबंधित माहिती

कुठल्याही कॉलेजात प्रवेश घेण्यापूर्वी काही प्रश्न स्वत:ला विचारा
  • आपण जे कॉलेज प्रवेशासाठी निवडतो आहोत त्याला खरचं विद्यापीठाची मान्यता आहे का ? मान्यता असल्यास कोणत्या विद्यापीठाची ?
  • त्या विद्यापीठातून संलग्न संस्थातून मिळणार्‍या पदवीला कितीसे महत्त्व आहे ? 
  • जी फी आकारली जाते आहे त्या फीच्या मोबदल्यात मिळणार्‍या सोयीसुविधा सुयोग्य आहेत का ?
  • कॉलेजचे वातावरण कसे आहे ? व्यावसायिक कोर्ससाठी पूरक आहे का ?
  • उद्या व्यावसायिक आयुष्यात उतरल्यानंतर आवश्यक असणारी सगळी स्किल्स त्या अभ्यासक्रमात खरोखरच शिकवली जातात का ?
  • फी भरण्याआधी तुम्ही कॉलेजला भेट द्यायलाच हवी. त्या अभ्यासक्रमाला असलेल्या सिनिअर्स विद्यार्थ्यांशी चर्चा करायला हवी.
  • त्यांना तुम्ही अभ्यासक्रमाबद्दल आणि कॉलेजमधल्या वातावरणाबद्दल पुरेसे प्रश्न विचारून माहिती जमवली आहे का ?
  • तुम्ही जो अभ्यासक्रम निवडला आहे त्याची मूलभूत माहिती तुम्हाला आहे का ? उदा. तुम्ही जर मासकॉम ला प्रवेश घेत असाल तर टेलिव्हीजन आणि चित्रपट यांच्याबद्दलचे पुरेसे शिक्षण तुम्हाला त्या कॉलेजमध्ये मिळणार आहे का ?
  • मिळणारे शिक्षण व्यावसायिक पातळीवर उपयुक्त ठरणारे आहे की फक्त पुस्तकी आहे ? ही माहिती तुम्हाला इंटरनेटवरुन सहज मिळू शकते.
  • अभ्यासक्रमात काय काय आणि कुठल्या पद्धतीने शिकवले जाते हे तपासले तर तुम्ही शिक्षणाच्या दर्जाबद्दल अंदाज लावू शकता.
  • कॉलेजचं गुळगुळीत ब्रोशर आणि चकचकीत कपड्यातला स्टाफ या गोष्टींवर चुकूनही भाळू नका. या गोष्टी व्यवहार ज्ञान शिकवू शकत नाहीत.
  • त्यासाठी चांगले शिक्षण आणि चांगल्या सोयीसुविधा असणं आत्यंतिक आवश्यक असतं.
  • तुम्ही निवडलेल्या कॉलेजमध्ये वैयक्तिक पातळीवर किती लक्ष दिले जाते, किती ‘स्कोप’ दिला जातो याचीही चौकशी करा. ही चौकशी तुम्ही थेट कॉलेजमध्ये जाऊनही करू शकता. अशावेळी तुमच्या प्रश्नांची तुम्हाला योग्य उत्तरं मिळाली तर ते कॉलेज तुमच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त आहे असं समजायला हरकत नाही.
  • अनेकदा ॲडमिशन मिळाल्याच्या आनंदात, घाईगडबडीत बारीक सारीक माहिती गोळा करण्याच्या भानगडीत आपण पडत नाही. पण त्याचे अनेकदा दुष्परिणाम कॉलेज सुरू झाल्यानंतर भोगावे लागू शकतात. त्यामुळे प्रवेशाची घाई न करता आधी सर्व माहिती गोळा करा.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नुसते पुस्तकी रट्टे कॉलेजात मारले जातात की प्रत्यक्ष अनुभवावर आधारित शिक्षण मिळतं हे तपासा.
  • खात्री झाली की मगच प्रवेश घ्या. वर्ष वाया जाऊ नये म्हणून मिळेल तिथे प्रवेश घ्यायचा, दामदुप्पट फी भरायची आणि डोक्याचे घडे रिकामेच ठेवायचे असं करू नका.

अत्यंत सामान्य वाटणारे हे वरील प्रश्न स्वत:ला विचारा, उत्तरं तुमची तुम्हालाच सापडतील.

जाहिरात : तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवा फक्त रु. 1999/- मध्ये

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comments (1)

Comments are closed.