शिक्षण

एक पाऊल स्वप्नांच्या दिशेनं

A Step Towards Dreams | Aapli Mayboli

दहावी झाली. आता एक नवं आयुष्य आपली वाट पाहत आहे ही कल्पनाच हुरळून टाकणारी असते. इतकी वर्ष आपलं एक छोटसं जग असतं. आपलं स्वत:चं, हक्काचं. आता या छोट्याशा जगामधून एका मोठ्या जगामध्ये पाऊल ठेवताना वेगवेगळ्या भावनांनी मन व्यापलेलं असतं. या नव्या जगाबद्दलची उत्सुकता असते. कसं असेल हे नवं जग ? मन भांबावून जातं… थोडी भीती, थोडी हुरहुर… हे जग मला आपलं म्हणेल ना ? कॉलेजमध्ये नवीन मित्रमैत्रिणी भेटतील ना ? त्यांना मी आवडीन ना ? आणि त्याचबरोबर हे नवं जग कसं असेल याची उत्सुकता, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी धडपड करण्याची तयारी आणि ती पूर्ण करायचीच हा आत्मविश्वास.

हे सगळे विचार कॉलेजला जायच्या आधीपासूनच मनात कालवाकालव करीत असतात आणि शेवटी कॉलेजचा पहिला दिवस येतो. इतके दिवस या दिवसाचं स्वप्न बंद डोळ्यांनी पाहिलेलं असतं आणि त्या दिवसाची आतुरतेनं वाट पाहिलेली असते.

थोडी भीती, थोडी हुरहुर, थोडी चुटपुट, थोडी उत्सुकता

इतक्या वेळा स्वप्नांमध्ये जगलेला, अनुभवलेला हा दिवस जेव्हा मात्र प्रत्यक्ष येतो तेव्हा पोटात कसंकसंच व्हायला लागतं. थोडीशी भीती, थोडीशी हुरहुर आणि खूप सारी उत्सुकता. कॉलेजच्या पहिल्या दिवसाची चाहूल लागताच सगळी तयारी करायला सुरुवात झालेली असतेच. सध्या काय ‘ट्रेंड’ चाललाय, त्यानुसार कपडे-शूज यांचं शॉपिंग तर कधीच झालेलं असतं. तेवढचं एक निमित्त शॉपिंगला.

वह्या-पुस्तकं, अभ्यास असलं काही सुरूवातीला डोक्यात नसतंच. स्वच्छंदी जीवनाच्या हव्यासानचं सारं मन व्यापलेलं असतं. तसं काही ‘सिनिअर्स’ शी आधीच ओळखी असतात. त्यांच्याकडून कॉलेजबद्दलच्या ‘महत्त्वाच्या’ विषयांवरचं ज्ञान मिळवलेलं असतंच. म्हणजे कल्चरल किंवा स्पोर्ट्सचे हेड कोण, कॉलेजच्या कट्ट्यावर कोण कोण असतं., आसपासचे कूल हॅंगआऊट्स कुठले वगैरे वगैरे. अगदीच पुढे जाऊन हे पण समजून घेतलेलंच असतं, की कुठले प्रोफेसर्स अटेंडन्सच्या बाबतीत जरा स्ट्रिक्ट आहेत म्हणजे त्याप्रमाणे सेटिंग लावायला. कॉलेजचा पहिला दिवस हा फक्त ज्युनिअर्ससाठीच महत्त्वाचा नाही तर सिनिअर्ससाठी सुद्धा कुतूहलाचा असतोच. एवढे नवीन चेहरे कॉलेजमध्ये येणार असतात.

प्रत्येकाच्याच आयुष्यात हा पहिला दिवस येतो. नवं काहीतरी आयुष्यात घडणार असतं त्याचा थरार पदोपदी जाणवत असतो. इतकंच नाही तर मनात कितीही धडधडत असलं तरी कॉलेजच्या गेटमधून आत जाताना आपण आता मोठे झालो आहोत आणि यापुढची आपली सगळी वाटचाल, आपलं भवितव्य, करिअर घडवणारी ठरणार आहे याची जाणीवही झालेलीच असते.

कॉलेजला जाताना काय कराल ?
  1. कोणतेही पूर्वग्रह मनात न ठेवता मोकळ्या मनाने नवीन वातावरणात सहभागी व्हा.
  2. स्वत:ची व्हिजन डेव्हलप करून स्वत:ला काय करायला जमते, आवडते त्यामधले नॉलेज व स्किल मिळवा.
  3. कोणत्याही पदवीच्या कागदालाच फक्त महत्त्व न देता ज्ञान व कौशल्य यांना महत्त्व द्या.
  4. ‘लर्न ॲण्ड अर्न’ संकल्पना प्रत्यक्षात आणता येण्यासाठी प्रयत्न करा. शिकता शिकता एखादे काम, एखादा जॉब शोधत रहा. त्यातून मिळणारा अनुभव हा मिळणार्‍या पैशांपेक्षा अधिक मोलाचा असेल.

या नवीन वर्षासाठी येणार्‍या प्रत्येक भल्याबुर्‍या नव्या अनुभवासाठी सगळ्यांना शुभेच्छा. खूप धम्माल करा. मजा करा. कॉलेजमध्ये का आलात हे मात्र विसरू नका आणि ठेवा पहिलं पाऊल आत्मविश्वासानं तुमची स्वप्नं पूर्ण करण्याच्या दिशेनं.

– स्वराली परांजपे

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comments (4)

  1. […] हेही वाचा : एक पाऊल स्वप्नांच्या दिशेनं […]

  2. […] हेही वाचा : एक पाऊल स्वप्नांच्या दिशेनं […]

  3. […] हेही वाचा : एक पाऊल स्वप्नांच्या दिशेनं […]

  4. […] हेही वाचा : एक पाऊल स्वप्नांच्या दिशेनं […]

Comments are closed.