इतर

गृहिणींना उद्योजक बनण्यासाठी घरून करता येणारे व्यवसाय

Women Business from home to become entrepreneur | Aapli Mayboli

कोणत्याही गृहिणीला विचारले तुम्ही काय करता तर ती सरळ म्हणते ‘मी घरीच असते’. खरंतर घरी राहून घर सांभाळणे हा चोवीस तास जॉबच आहे परंतु भारतात स्त्रीला दुय्यमच स्थान दिले जाते. प्रत्येक स्त्रीला स्वतःच अस्तिव असावं आणि आपणही घर संसार सगळं सांभाळत काहीतरी करावं असं वाटत असते.

नोकरी करून सगळ्यांनाच शक्य होते असे नाही तर काहींचा नोकरी करणे पिंड नसतो. स्वतःचा उदयोग असावा ज्यातून चार पैसे मिळतील, संसाराला हातभार लागेल सोबत स्वतःला स्वतःचा अभिमान वाटेल असे काहीतरी सुरू करावे असे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते.

आता काळ बदलला आहे. घरी बसून व्यवसाय प्रशिक्षण घेऊन स्त्रिया स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. आत्मविश्वास व प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर त्या व्यवसायात भरघोस यश देखील मिळवू शकतात.

पण कोणता व्यवसाय नक्की करावा हा प्रश्न प्रत्येक सखीला पडत असेल. या लेखात आपण तेच जाणून घेणार आहोत. घरी बसून किंवा घरातून स्त्रियांना सुरू करता येणार व्यवसाय :-
(best small business ideas for women entrepreneurs)

ब्युटी पार्लर

प्रत्येक स्त्रीला सुंदर दिसायचे असते. आधीच्या काळापेक्षा सध्याचा काळ आधुनिक तंत्रज्ञान व विचारांनी देखील सुधारल्या मुळे स्त्रिया स्वतःची काळजी घेतात. अगदी पायाच्या नखापासून ते केसांपर्यत स्त्रिया स्वतःला अपटूडेट ठेवतात. लग्न समारंभ असो की कोणताही कार्यक्रम असो किंवा महिन्याला स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी त्या ब्युटी पार्लरमध्ये जातात.

ब्युटी पार्लर व्यवसाय हा खेडेगावपासून शहरात देखील चांगला चालतो. ज्या स्त्रियांना मेकअप आर्टिस्ट मध्ये इंटरेस्ट असेल त्यांनी ब्युटी पार्लरचा कोर्स नक्की करावा. विविध सरकारी संस्था कडून देखील आता ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण दिले जाते. व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन, योग्य अनुभव आल्यावर स्त्रिया घरून स्वतःच पार्लर सुरू करू शकतात. प्रामाणिकपणा व काम करण्याची चिकाटी यामुळे या व्यवसायात चांगली प्रगती होते. ब्युटी पार्लर व्यवसायातून चांगली कमाई तर होऊ शकतेच व स्वावलंबी असण्याचे समाधान देखील मिळेल.

बेकिंग, कुकिंग, केक बनवणे

स्त्री ही अन्नपूर्णा असते. सगळ्यांच्या आवडी निवडी, प्रेमाने खाण्यातून सगळ्यांची मनं जिंकण्याची कला तिला अवगत असते. याच कलेचा वापर करून ती स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते. बऱ्याच स्त्रिया उत्तम जेवण बनवतात तर काहीजणी उत्तम बेकिंग करतात. केक्झ चॉकलेटस उत्तम बनवतात.

स्वतःची ही कला घरापुरती मर्यादित न ठेवता त्याच रूपांतर व्यवसायात केले की यश हमखास मिळू शकेल. आपला बिझनेस ऑनलाईन माध्यमातून जगापर्यंत पोहचवू शकता. केक बनवण्याची आवड असेल तर कमी गुंतवणूकीत या व्यवसायाची सुरुवात करू शकता.

सुरुवातीला जवळच्या लोकांना, ओळखीच्या व्यक्तींना केक बनवून द्यावे. तुमचं काम परफेक्ट असेल व लोकांना आवडत असेल तर माऊथ पब्लिसिटी होऊन तुमचे ग्राहक वाढू शकतात. स्वच्छता व प्रामाणिक पणा या व्यवसायात आवश्यक आहे. ग्राहकांची आवड जाणून घेऊन त्याप्रमाणे व्यवसाय वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत.

होम ट्युशन सुरू करा

स्वतःच्या शिक्षणाचा वापर करण्यासाठी, आपल्याकडे असलेले ज्ञान देण्यासाठी होम ट्यूशन हा उत्तम पर्याय आहे. एखाद्या विषयाचे तुम्हाला सखोल ज्ञान असेल व स्वतःवर आत्मविश्वास असेल तर विद्यार्थ्यांसाठी घरी ट्युशन घेण्याचे काम तुम्ही करू शकता.

केवळ शैक्षणिक ट्युशनच नाहीतर बेकिंग, कुकिंग, शिलाई क्लास, ब्युटी पार्लर कोर्स, हस्तकला अशा ज्या कला तुम्हाला अवगत असतील त्यांचे क्लासेस घेण्यासाठी सुरूवात करू शकता. यासाठी सुरुवातीला लहान मुलांचे क्लासेस घ्यायला सुरू करू शकता नंतर मोठ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करावे.

तसेच अलीकडे ऑनलाईन क्लासेस देखील चालतात तेव्हा घर सांभाळून ऑनलाईन क्लासेस सुरू करू शकता.

ब्लॉगर

लिखाणाची ज्या स्त्रियांना आवड असेल, चांगले लिखाण येत असेल तर ब्लॉगिंग सुरू शकता. ब्लॉगिंग साठी एक वेबसाईट बनवून त्यावर वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहू शकता. यासाठी महिन्याला ठराविक रक्कम मिळते. तसेच एखाद्या कंपनी साठी, प्रोजेक्ट साठी, पोर्टल साठी लेख लिहू शकता.

ब्लॉग सुरू करायचा असेल तर फूड ब्लॉग, ट्रॅव्हल ब्लॉग, फोटोग्राफी ब्लॉग, ब्युटी ब्लॉग, शैक्षणिक ब्लॉग, कला – साहित्य ब्लॉग इत्यादी अनेक विषयांवर ब्लॉग्ज लिहून पैसे कमवू शकता.

फॅशन डिझायनर

स्त्रियांना कपडे, रंगसंगती, फॅशन यामध्ये खूप रस असतो. फॅशन डिझायनर हे स्त्रियांसाठी उत्तम करिअर ठरू शकते. नोकरी करायची नसेल तर फॅशन डिझायनिंगचा योग्य कोर्स करून स्वतःचे बुटीक सुरू करता येते. यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी, चिकाटी व वेगवेगळ्या स्टायलिश डिझाईन मार्केट मध्ये आणणे गरजेचे आहे.

काळानुसार अपडेट राहणे आवश्यक आहे. कोणत्याही व्यवसायात ग्राहक हा महत्वाचा घटक असतो. त्याच्या मागणीनुसार, आवडीनुसार उत्पादन असेल तर व्यवसाय वृद्धी होण्यास मदत होते. या व्यवसायात देखील ग्राहकाला सतत काहीतरी नवीन व चांगलेच हवे असते. त्यामुळे ग्राहकांचे मन जिंकले तर तुमचा व्यवसाय नक्कीच चांगला वाढेल. तुमची डिझाइन, तुमचा ब्रँड ग्राहकांना आकर्षित असेल असा असावा याची काळजी जरूर घ्यावी.

ज्या कला अवगत असतील त्या कलेच रूपांतर व्यवसायात करण्यासाठी प्रत्येक स्त्री कडे कौशल्य असते. स्त्रीने त्या कौशल्याचा योग्य वापर करून स्वतःचा व्यवसाय उभा करून स्वावलंबी बनावे. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here