व्यवसाय जाहिराती

व्हिजा प्रक्रिया म्हणजे काय ? दुतावासात नक्की काय घडते ?

What is Visa Processing - What Happens in the Embassy | Aapli Mayboli

‘ज्या कोणत्या व्यक्तीने आजतागायत ‘व्हिजा’ साठी प्रक्रिया केली असेल, अशा प्रत्येकाला ‘दुतावासात’ व्हिजा प्रोसेस नक्की कशी होते, या बद्दल कुतूहल अवश्य असणार! आज आपण जाणून घेऊयात “व्हिजा प्रक्रिया’ म्हणजे नक्की काय ?

व्हिजा प्रोसेस (प्रक्रिये) चे मुख्यत: दोन महत्वाचे अंग आहेत :
भाग १ भाग २
१. अर्जदार (Applicant) भूमिका दूतावास (Embassy)
१. प्रवासाचा हेतू ठरविणे
२. कोणत्या देशात प्रवास करणे
प्रक्रिया १) अर्जदाराची कायदेशीर छाननी/तपासणी
२) अर्जदाराची पार्श्वभूमी छाननी
३) व्हीजाचा निकाल/निश्चिती

व्हिजा प्रक्रियेमध्ये पहिला भाग आणि भूमिका ही अर्जदाराची म्हणजेच जी व्यक्ती स्वत: प्रवास करणार आहे त्याची / तिचे असते. अर्जदार / प्रवासी कोणत्या देशाला भेट देणार आहे आणि त्या मागील उद्देश / हेतू काय, हा व्हिजा प्रक्रियेचा पहिला भाग.

दुसऱ्या भागात पूर्ण भूमिका ही दूतावासावरच (Embassy) अवलंबून असते, यामध्ये व्हिजा अर्जदाराची (प्रवासी) इतंभूत आणि कायदेशीर छाननी होते. यात अर्जदाराची पार्श्वभूमी तपासणे, इतर कायदेशीर प्रक्रिया आणि अंतिम व्हिजाचा निर्णय घोषित करणे या ३ प्रक्रिया समाविष्ट आहेत.

आता जाणून घेऊयात, एका अर्जदारासाठी (Visa Application) सविस्तर प्रक्रिया कशी होते ? (प्रक्रिया व्हिजा भाग : १)

ज्या देशात प्रवास करायचा आहे त्या देशाची निश्चिती आणि भेटीचा/प्रवासामागील उद्देश ठरविणे :

व्हिजा अर्जकर्त्याला ज्या देशाला भेट द्यायची आहे, त्या प्रवासासाठी आणि भेटी मागील सबळ, साधार (पुराव्यानिशी) आणि स्वीकारण्याजोगे ‘कारण’ म्हणजेच उद्देश निश्चित असावे.

जसे की त्या देशाला भेट दिल्यावर किती काळासाठी मी तिथे राहणार आहे ? माझा राहण्याचा कालावधी काही दिवसांपुरता/तात्पुरता आहे की मला काही महिने-वर्षा करिता/दिर्घकालासाठी राहणे गरजेचे आहे. राहण्याच्या कालावधी निश्चिती नंतर पुढील प्रक्रिया सुरु होते.

भेटीचा उद्देश आणि त्यानुसार प्रवासाच्या हेतूची श्रेणी (प्रकार) ठरविणे :

प्रत्येक देशाच्या दुतावासाने प्रवाशाच्या भेटीच्या उद्देशानुसार आणि प्रवाशांच्या प्रकारानुसार‘व्हिजा’चेप्रकार (व्हिजा श्रेणी) नेमून दिल्या आहेत.

अर्जदाराने‘अ’ या देशाला भेट देण्याचे ठरविले, तर त्या देशाने ठरवून दिलेले‘व्हिजा’ चे प्रकार म्हणजेच ‘व्हिजा’च्या श्रेण्या तपासणे आवश्यक आहे.

टीप: प्रत्येक देशाने व्हीजाचे एकाहून अनेक प्रकार म्हणजेच ‘व्हिजा श्रेणी’ठरविल्या असतीलच असे नाही. मात्र, व्हिजा प्रक्रिया आणि अर्जदारास सोपे व्हावे म्हणून एका मुख्य श्रेणी (प्रकारा) मध्ये, अंतर्गत उपश्रेणी (उप-प्रकार) नेमून दिले आहेत.

कागदपत्रांची जुळवणी :

व्हिजा चा प्रकार म्हणजेच श्रेणी निश्चित झाल्यानंतर, प्रवाशाने यादीनुसार कागदपत्रांचे संकलन
आणि जुळवणी करण्यास सुरुवात करावी. यामध्ये :

    1. कागदपत्रांची जुळवणी
    2. कागदपत्रांची फेर तपासणी
    3. भाषांतर (आवश्यकतेनुसार/सुचनेनुसार)
    4. प्रमाणिकरण (Attention) व Appostile इ.

टिप : व्हिजा प्रक्रियेसाठी अर्ज करण्यापूर्वी पासपोर्टची वैधता आवश्यकतेनुसार आहे की नाही, हे तपासणे गरजेचे आहे. तसेच, दूतावासाच्या सूचनेप्रमाणे कागदपत्रांची पूर्तता, कागदपत्रांचे स्वरूप आणि आराखडा जुळवणे आवश्यक आहे.

अर्जदाराने ‘अ’ या देशाला भेट देण्याचे ठरविले, तर त्या देशाने ठरवून दिलेले‘व्हिजा’ चे प्रकार म्हणजेच ‘व्हिजा’च्या श्रेण्या तपासणे आवश्यक आहे.

तसेच दूतावासाच्या प्रक्रीये मध्ये काही देशांसाठी व्हिजा प्रक्रीये आधीच निवास/राहण्याची सोय आणि वाहतुकीची व्यवस्था नियोजित आणि आरक्षित असणेआवश्यक असते.

व्हिजा फॉर्म (अर्ज) भरणे :

व्हिजा प्रकार / श्रेणी नुसार व्हिजा फॉर्म (अर्जा ) चा आराखडा बदलू शकतो. उदा. ई-व्हिजा साठी पूर्ण प्रक्रिया नावानुसार ऑनलाईनच चालते. अर्जदाराला दूतावासाच्या संकेतस्थळाला (Embassy Website) ला भेट देऊन, स्वत:च्या ई-मेल ने लॉग ऑन करून, ऑन-लाईनच अर्ज भरावा लागतो.

तसेच सर्व आवश्यक कागदपत्रेही, दिलेल्या स्वरूपानुसार जोडावी (Submit) लागतात. मात्र, अर्जदार म्हणजे प्रवासी जर स्टॅम्प व्हिजासाठी अर्ज करत असेल, तर सर्व कागदपत्रे जवळील कॉन्सुलेट ऑफिस किंवा ‘व्हिजा अँप्लिकेशन सेंटर’ मध्ये जाऊन द्यावी लागतात.

व्हिजा अँप्लिकेशन (अर्ज) भरणे–व्हिजा अपॉन्टमेंट–व्हिजा मुलाखत :

– या प्रक्रियेमध्ये सुद्धा, व्हिजाच्या प्रकारानुसार सबमिशन (व्हिजा प्रकारचा अर्ज भरणे) ही प्रक्रिया वेगळी असू शकते, मात्र या सर्व प्रकारांमध्ये व्हिजा फी भरणेही सर्व समान आणि महत्वाची पायरी ठरते.

दूतावासाद्वारे होणारी व्हिजा प्रक्रिया (व्हिजा प्रक्रिया भाग : २)

दाखल केलेले व्हिजा अँप्लिकेशन (अर्ज), संबंधित देशाच्या दूतावासाद्वारे (Embassy) किंवा वाणिज्य दूतावासाद्वारे (Consulate) पुढील प्रक्रियेसाठी प्रवास निरीक्षक (इमिग्रेशन ऑफिसर) किंवा वाणिज्य प्रवास निरीक्षक (कॉन्सुलेट जनरल) यांच्याकडे सुपूर्द केले जाते.

हे दोन अधिकारी, यजमान देश आणि अर्जदाराच्या देशामधील द्विपक्षीय संबंधांमधील दुवा ठरतात. त्यामुळेच या अधिकाऱ्यांकडील अर्जाचा आकडा ही मोठा असतो.

एका वाणिज्य दूतावासात (consulate), अनेक इमिग्रेशन अधिकारी जरी असले, तरी प्रत्येक व्हिजा अर्जाची छाननी, त्याची पार्श्वभूमी भिन्न असल्याकारणे, त्या अर्जाच्या विश्लेषणास आणि पुनरावलोकनास वेळ लागूच शकतो. आणि तत्सम प्रक्रियांना लागणारी नियोजित वेळ अर्जदारास कळवली जाते.

दूतावासामध्ये खालील घटकांवर आधारित, अर्जाची छाननी केली जाते :

1. अर्जदाराची ओळख :

अर्जदाराच्या ओळखीची खात्री करणे, हा प्रथम आणि मुलभूत टप्पा असतो. यात अर्जदाराची ओळख पटवून देणारे आणि अर्जदाराचे अर्जा नुसार नाव नमूद असलेले कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरलेजाते.

    1. पासपोर्ट
    2. राष्ट्रीय ओळखपत्र
    3. अर्जदाराच्या नावावरील कोणतेही शासकीय दस्तावेज
2. आर्थिक स्थितीची सत्यता पडताळणे :

अर्जदाराच्या बँक खात्याचे विवरण, मिळकतीची कागदपत्रे, वेतनपत्र इ. ची छाननी केली जाते. या सर्व कागदपत्रांची सत्यता आणि संदर्भ याची खातरजमा केली जाते.

3. कौटुंबिक माहिती :

अर्जदाराच्या नातेसंबंधांची माहिती आणि मूल्यमापन केले जाते. यात, अर्जदाराने मायदेशी परत्याइतकी भावनिक सलगी, नात्यांमधील ओलावा अप्रत्यक्षपणे चाचपला जातो.

4. शैक्षणिक पात्रता :

यात गुणपत्रिका, शैक्षणिक प्रमाणपत्रे यांचा वापर करून अर्जदाराच्या साक्षस्तेव शिक्कामोर्तब केले जाते. व्हिजाच्या श्रेणीनुसार हे शैक्षणिक दस्तऐवज, त्या श्रेणीची पूर्तता करतात का, त्यांचे मुल्यांकन आणि संदर्भ तपासला जातो.

5. वैवाहिक स्थिती :

अर्जदाराच्या वैवाहिक स्थिती नुसार त्याचा परराष्ट्राला भेट देण्याचा हेतू गैर तर नाही ना, याची खात्री केली जाते.

6. रोजगार / वैवाहिक स्थिती :

यामध्ये अर्जदाराच्या उत्पन्नाचा स्त्रोत, आर्थिक स्थैर्य आणि उत्पन्नाची सत्यता, याचे ताळमेळ जुळवले जातात.

7. इमिग्रेशन नोंद :

उद्देशाची सत्यता ही भूतकाळातील प्रवासाच्या इमिग्रेशन नोंदीवरून तपासली जाते.

8. मायदेशाशी लागेबंध / संबंध :

यामध्ये फक्त वैवाहिक स्थिती, विवाहित/अविवाहित, या जोरावर मायदेशाशी असलेले संबंध, जबाबदारी तपासली जात नाही, उलट

    1. रोजगार
    2. कुटुंब
    3. मित्र आणि आप्तेष्ट
    4. सामाजिक हितसंबंध इ. घटक जे अर्जदाराला मातृभूमीला परतण्यास कारक ठरतील, याचीही खात्री केली जाते.
9. अर्जदाराची व्हिजासंबंधित नियमांशी पूरकता/संहिता (संकेत अनुपालन) :

प्रत्येक देशाने, त्या त्या प्रदेशात नागरिकांचे स्थलांतराचे नियमन करण्यासाठी, व्हिजा व परदेशी नागरिक, असे कायदे ठरवून दिले आहेत, म्हणून दुतावासाने स्थलांतर कायदा व अर्जदाराच्या पात्रतेवर मर्यादा ठरवलेल्या नाहीत.

10. मुलाखत किंवा अतिरिक्त माहिती साठी विनंती :

दूतावासातील अधिकाऱ्यांना अर्जदाराची माहिती / कागदपत्रे जर अपुरी/असमाधानकारक आढळली, तर आवश्यकतेनुसार ज्यादाची माहिती मागविली जाते आणि सदर माहिती/कागदपत्रे यांची नेमून दिलेल्या वेळेत पूर्तता करावी लागते.

काही देशांच्या दुतावासाद्वारे, मुलाखतीच्या आधारेच व्हिजाचा अंतिम निर्णय घोषित केला जातो. तर काही देशांच्या दुतावासाव्दरे दूरध्वनीद्वारे संपर्क करून आवश्यक प्रश्नांची पूर्तता केली जाते.

टिप : वरील नमूद केलेले घटक हे दूतावासाद्वारे विचार केलेले जाणारे मुख्य घटक आहेत. मात्र या व्यतिरिक्त देखील दूतावास इतर स्त्रोतांकडून आवश्यक माहिती घेऊन, अर्जदाराची छाननी करूच शकते.

व्हिजा अँप्लिकेशन सेंटर / व्हिजा अर्ज केंद्र :
व्हिजा अर्जाच्या संकलनासाठी सरकारद्वारे नेमलेले भागीदार, मला ज्यांचा व्हिजाच्या अंतिम निर्णयावर कोणताच प्रभाव/नियंत्रण राहत नाही.

वैवाहिक स्थिती :
वैवाहिक स्थिती बद्दल खोटी माहिती देऊन अनेक प्रवासी, परदेशातील स्थानिक नागरिकांसोबत लग्न करून स्थायिक झाले आहेत.

व्हिसास संदर्भात अधिक माहिती साठी https://btwvisas.com या आमच्या वेबसाइट ला भेट द्या.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comments (2)

Comment here