आरोग्य

काळ्या / कोऱ्या चहाचे आरोग्यदायी फायदे

Black Tea Benefits | Aapli Mayboli

चहा कोणाला आवडत नाही? जवळपास ऐंशी टक्के लोकांना सकाळी उठल्यावर दिवसभर तरतरी राहण्यासाठी चहा हा लागतोच. काहींना दुधाचा चहा तर काहींना काळा चहा आवडतो, काहींना नाईलाजाने काळा चहा घ्यावा लागतो.

काळा चहा म्हणजे अलीकडे फेमस असलेला ब्लॅक टी (black tea) व आपल्या बोली भाषेतील कोरा चहा. वजन कमी करण्यापासून ते केस, चेहरा यांचे सौंदर्य वाढविण्यापर्यंत ब्लॅक टी उपयोगी ठरतो.

तसा चहा जास्त घेऊ नये म्हणतात परंतु ब्लॅक टीचे असंख्य असे फायदे आहेत जे शरीराला व तुमच्या सौंदर्याला तजेलदार ठेवतात. कोणतीही गोष्ट मर्यादित घेतलेली चांगली असते तसेच ब्लॅक टी देखील प्रमाणात व वेळेत घेतल्यास त्याचे शरीराला खुप फायदे होतात. (health benefits of drinking black tea)

तर आज पाहूया काळ्या चहाचे फायदे / ब्लॅक टी पिण्याचे आरोग्यदायी फायदे

मधुमेहापासून दूर ठेवते

मधुमेह अलीकडे कोणत्याही वयात व केव्हाही होणार रोग झाला आहे व तो झाल्यावर पूर्णपणे बरा होण्याची शक्यता फार धूसर असते. त्यामुळे मधुमेह कसा होऊ नये व त्यासाठी आधीच काळजी घेणे, सतर्क राहणे गरजेचे आहे. यासाठी काळा चहा उपयोगी ठरतो.

नियमितपणे दिवसातुन रोज एक किंवा दोन वेळा काळा चहा पीत असाल तर मधुमेह रोग जडण्याची शक्यता फार कमी असते. ब्लॅक टी मध्ये असणारे अँटी ऑक्सिडंट्स टाइप 2 मधुमेह रोखण्यासाठी मदत करतात म्हणून कोरा चहा दिवसातून एकदा तरी सेवन करावा.

वजन कमी होण्यासाठी मदत

वजन कमी होत नाही ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यासाठी डाएट, जिम वगैरे वगैरे उपाय चालू असतात. ब्लॅक टी देखील वजन कमी होण्यासाठी मदत करते. यासाठी रोज सकाळी ब्लॅक टी घ्यावी.

जेवण बंद करून केवळ ब्लॅक टी घेण्याचा विचार करत असाल तर तो अयोग्य आहे. ब्लॅक टी मधील मॅटोबॉलिझम वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो परंतु त्यासाठी नियमित वेळेत ब्लॅक टी घ्यावीच व सोबत व्यवस्थित आहार व व्यायाम देखील करावा.

दमा आजारापासून मुक्तता

हिवाळ्यात, उन्हाळ्यात बऱ्याच जणांना दम्याचा त्रास होतो. श्वास घेण्यासाठी त्रास होतो. ब्लॅक टी चे नियमितपणे सेवन केल्यास दमा आजार बरा होऊ शकतो. ब्लॅक टी मधील अँटी ऑक्सिडेंटस व पॉलिथिन हे दमा बरा होण्यासाठी फायदेशीर ठरतात. दमा असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने कोरा चहा घेणे.

मुतखडा आजार बरा होण्यास मदत

मुतखडा आजारावर ब्लॅक टी एक औषध म्हणून घ्यावे. मुतखडा लवकर निघावा यासाठी अनेक घरगुती उपाय केले जातात त्यातीलच कोरा चहा सेवन करण्याचा उपाय देखील फायदेशीर ठरतो. यासाठी रोज ठरलेल्या वेळेत ब्लॅक टी चे सेवन करावे याने मुतखडा लवकर निघायला मदत होते. तसेच या आजारात जास्त पाणीदेखील प्यावे.

थकवा दूर होण्यासाठी

आजकालचे आयुष्य खूप धकाधकीचे व तणावाचे झाले आहे. सध्याची जीवनशैली अशी आहे की चोवीस तास काम, टेंशन्स, जबाबदाऱ्या यामुळे सतत तणावाखाली असल्यासारखे जाणवत राहते. तणाव दूर करण्यासाठी ब्लॅक टी नक्कीच चांगलं काम करते. ब्लॅक टी मधील एलथीनाईन आपला थकवा दूर करून तजेलदार राहण्यासाठी मदत करते.

फार कंटाळा आला असेल, आळस आला असेल तर कोरा चहा घेतल्यावर एकदम बरे वाटायला लागते. टेन्शन दूर पळून सकारात्मक वाटायला मदत होते. ब्लॅक टी मुळे जरी थकवा दूर होत असला तरी प्रमाणातच सेवन करावे.

कर्करोगाचा धोका कमी होतो

ब्लॅक टी मध्ये पॉलिफेनॉल असते ज्यामुळे ट्युमर सारखा आजार वाढण्यावर प्रतिबंध येतो. कर्करोग सारखे आजार होण्याचा धोका कमी होतो.

कोरा चहा किंवा काळ्या चहाचे सेवन नियमितपणे केल्यास स्तन, त्वचा, फुप्फुस इत्यादीचा कर्करोग होण्याचा धोका टळतो. पण केवळ काळ्या चहा मुळेच कर्करोग धोका टळतो असे नाही तर त्यासाठी संपूर्ण जीवनशैली निरोगी जगावी.

कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत

ब्लॅक टी मध्ये आढळणारे अँटीऑक्सिडंट्स शरीरास बऱ्याच बाबतीत फायदेशीर ठरतात. यातील फ्लेव्होनोईडस मूळे हृदयाचे कामकाज व्यवस्थित चालते व कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.

केसांचे सौंदर्य वाढण्यास मदत

ब्लॅक टी किंवा काळ्या चहामुळे केसांचे सौंदर्य वाढते हे आश्चर्य कारक असले तरी खरे आहे. काळ्या चहाच्या पाण्याने केस धुतल्यास केस चमकदार होतात. केसगळती, कोंडा यांसारख्या समस्या दूर होतात. केस वाढण्यास देखील मदत होते. तसेच केसांना छान रंग चढतो.

केस धुण्यासाठी काळा चहा बनवताना पाणी व चहा पावडर टाकून उकळून घेणे. साखर टाकायची नाही. हे पाणी रात्रभर ठेऊन सकाळी याने केस धुतले की अजून चांगले केस होतात.

ब्लॅक टी मुळे केसांना फायदा होत असला तरी ते वारंवार वापरू नये. आठवड्यातून एकदा हा प्रयोग करू शकता.

इम्युनिटी वाढण्यास मदत

काळा चहा दररोज सेवन केल्यास मेंदूच्या पेशी निरोगी राहून रक्तप्रवाहाचे काम सुरळीतपणे पार पडते. अभ्यासानुसार काळा चहा सेवनाने मेंदू सतर्क व सजग होतो. स्मरणशक्ती वाढते व इम्युनिटी देखील वाढण्यास मदत होते.

चेहरा निरोगी व तजेलदार होण्यासाठी

काळा चहा दररोज सेवन केल्याने चेहरा देखील निरोगी तजेलदार दिसतो. चेहऱ्याच्या आरोग्यासाठी देखील ब्लॅक टी महत्वाचे काम करते. तसेच काळ्या चहातील अँटीऑक्सिडंट्स मुळे पोट व आतड्या संबंधी तक्रारी दूर होण्यास मदत होते.

असा बहुगुणी व औषधी ब्लॅक टी किंवा काळा चहा सगळ्यांनी आवर्जून घ्यावा. पण जसे फायदे असतात तसे दुष्परिणाम देखील असतात त्यामुळे ब्लॅक टी अतिसेवनाने आरोग्य बिघडू शकते. अति काळा चहा शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो म्हणून दररोज दोन वेळा घेतला तरी पुरेसे आहे.

काळा चहा करण्याची पध्द्त

१) काळा चहा बनवण्यासाठी दोन पद्धती आहेत त्यातील पहिली म्हणजे आपण नेहमीच चहा बनवतो तसा फक्त त्यात दूध मिसळू नये. पाणी, चहा पावडर व गरजेनुसार साखर ( नाही घातली तरी उत्तम) घालून चांगली उकळू द्यावी व या चहाचे सेवन करावे.

२) दुसरी पद्धत म्हणजे मार्केटमध्ये वेगवेगळ्या टी बॅग्स असतात त्यातील तुमच्या आवडीच्या आणून गरजेनुसार पाणी घेऊन त्यात टी बॅग 2 ते 3 मिनिटं किंवा त्याचा पूर्ण अर्क पाण्यात उतरेपर्यंत ठेवावी व त्यानंतर बॅग बाजूला काढून ब्लॅक टी चे सेवन करावे. कोणत्याही पद्धतीने ब्लॅक टी बनवून सेवन करू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here