संताप येतो तेव्हाची परिस्थिती तुम्हाला नीटपणे हाताळता येत नसेल, तर त्याचा आपल्या आरोग्यावर, कामावर आणि नात्यावरही निश्चितपणे परिणाम होतो. यावर एकच उपाय म्हणजे रागावर आपले नियंत्रण ठेवणे. त्यासाठी करा खालील काही उपाय :
१. लिहून काढा :
तुमच्या रागाचे स्पष्टीकरण शब्दरूपात कागदावर उतरवा, हे काही कुणाला दाखवण्यासाठी करू नका, तर आपल्याला जे वाटत होते किंवा वाटत आहे ते कितपत योग्य आहे, हे राग शांत झाल्यावर पुन्हा वाचून पहा.
२. शांत व्हा :
जेव्हा संतापाचा कडेलोट झालेला असतो तेव्हा समोरच्या व्यक्तीशी बोलणे टाळले पाहिजे. समोरच्या व्यक्तीशी संघर्ष टाळला तर परिस्थिती हाताळणे शक्य होते. राग आला असताना शांत राहणे अवघड वाटते. पण प्रयत्नानेते शक्य आहे.
३. आरडा ओरडा करू नका :
आरडाओरडा केल्यामुळे प्रश्न सुटण्या ऐवजी अधिक गुंतागुंतीचे बनतात. त्यातून चांगल्या नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते. शिवाय मुलांसमोर असे घडले तर त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो.
४. संवाद साधा :
जरा वेळ जाऊ द्या आणि मग तुम्हाला काय सांगायचे आहे, काय म्हणायचे आहे, याचा नीट विचार करा. आक्रमक होण्यापेक्षा काही गोष्टींमुळे तुम्हाला राग येत असल्याचे सांगा. प्रतिक्रिया व्यक्त करण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीचे सगळे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या.
५. वस्तुस्थिती स्वीकारा :
काही वेळा आयुष्यात अन्याय होतो, ही वास्तविकता स्वीकारली पाहिजे. तो आयुष्याचा भाग आहे. प्रत्येक वेळी सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतील असे नव्हे.
Comment here