सगळेच सेलिब्रिटीज फिट असतात, दिसतात. त्यांचं वजन वाढत नाही का? वाढत असेल तरी ते नियंत्रणात कसे आणतात? नेहमी फिट राहण्यासाठी, दिसण्यासाठी ते काय करत असतील हा प्रश्न नेहमी आपल्याला पडतो. यावर सोप्प उत्तर म्हणजे नियमितपणे ते वर्कआऊट करतात.
खरं आहे की ते दररोज न चुकता व्यायाम करतात पण त्याचबरोबर त्यांचा डाएट देखील योग्य असतो. पौष्टिक डाएट पण अति वजन वाढू नये असे पदार्थ त्यांच्या आहारात समाविष्ट असतात. त्यातील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे मखाना (fox nuts in marathi).
मखाना प्रकार आपण सर्वसामान्य लोकांनी फार कमी वेळा ऐकलेला असतो किंवा काहींनी ऐकलेला देखील नसतो, पाहिलेला देखील नसतो. मखाना हा एक पौष्टिक पदार्थ आहे जो स्नॅकचा एक प्रकार आहे. मखाने दिसायला पॉपकॉर्न सारखे व वजनाला अतिशय हलके असतात.
मखाना हे एक लो कॅलरी फूड आहे ज्याने वजन नियंत्रित राहण्यास मदत होते म्हणून सेलिब्रिटी डाएट मध्ये मखानाचा समावेश आवर्जून करतात (benefits of makhana in marathi).
हेही वाचा : ५ प्रकारचे पौष्टिक पराठे
मखानाचे आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत ते पाहूया :-
१) वजन कमी करणे
मखाने लो कॅलरी फूड आहे म्हणजे यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात. चवीला मखाने साखरेपेक्षाही कमी गोड असतात. वजन जास्त असलेल्यानी व ज्यांना वजन नियंत्रित करायचे आहे अशा लोकांनी नियमितपणे मखानाचे सेवन करावे. वजन वाढणार नाही व वजन नियंत्रित देखील राहील.
2) उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत
मखाने अँटी ऑक्सिडंट्स पदार्थ आहे सोबतच यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असते. शरीरातील मॅग्नेशियम रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत करते म्हणून ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी रोज चार पाच मखाने खावे. उच्च रक्तदाबापासून मुक्त होण्यास मदत होईल.
३) मधुमेही व्यक्तींसाठी फायदेशीर
मखाने चवीने साखरे पेक्षा कमी गोड असतात त्यामुळे मधुमेहाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी रोज मखाने खाल्ल्यास सुधारणा झाल्याची जाणवेल. मखाने मध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी प्रमाणात असल्यामुळे मधुमेहामुळे होणाऱ्या धोक्याची तीव्रता देखील कमी होते.
४) रक्त वाढण्यास मदत
रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांना डॉक्टर मखाना किंवा मखाना पावडर खायचा सल्ला देतात. मखाना मध्ये लोह जास्त प्रमाणात असते जे शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत करते. ज्यांना थकवा जाणवतो, रक्त कमी असते अशा व्यक्तींनी रोज मखाने खावे किंवा सर्व ड्रायफ्रूट पावडर मध्ये मखाना पावडर मिक्स करून ही पावडर रोज दुधातून घ्यावी. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढून थकवा दूर होतो व ताजेतवाने वाटते.
५) हाडे मजबूत होण्यास मदत
हाडे ठिसूळ झाल्यावर हात, पाय दुखणे, सुजणे अशा समस्या सुरु होतात. हाडे मजबूत राहण्यासाठी वृद्धांना तसेच बालकांना नियमितपणे मखान्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
मखाना मध्ये कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. शरीरातील कॅल्शियम योग्य प्रमाणात असल्यास हाडे ठिसूळ होत नाहीत. हाडे बळकट राहतात. म्हणून नियमितपणे पणे मखाने खाल्ल्यास वृद्धापकाळातही हाडे मजबूत राहतील. केवळ मखाने खायचा कंटाळा आल्यास मखानेची खीर बनवून देखील खाऊ शकता.
६) पोट स्वच्छ ठेवण्याचे काम
पोट दुखणे, पोट साफ न होणे, ऍसिडिटी अशा विविध समस्यांनी बरेचसे रुग्ण हैराण झालेले दिसतात.अशांसाठी मखाना म्हणजे वरदान आहे. मखाना मध्ये डिटॉक्सिफायिंग घटक असतात जे शरीरातील विषारी, निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. नियमितपणे मखाने खाल्ल्यास पोट स्वच्छ राहण्यास मदत होते व पोटाच्या तक्रारी कमी होतात.
७) डायरिया वर गुणकारी उपाय
खूपदा वातावरणातही बदलामुळे, दूषित पाण्यामुळे किंवा शिळे अन्न खाल्ल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे डायरियाचा ( जुलाब) त्रास उदभवतो. अशा वेळी तुपात भाजून मखाने खायला दिल्यास डायरियाचा त्रास हळूहळू कमी होतो. पोट शांत होते.
८) वातदोष
खुप जणांना वातदोष असतो. यामुळे शरीर दुखणे, झोप न येणे अशा समस्या उदभवतात. मखान्यामध्ये प्रोटीन जास्त असतात व वातशामक गुणधर्म आढळतात. वात दोष असणाऱ्या व्यक्तींनी मखान्याचे सेवन करावे त्यामुळे वाताचे शमन होऊन निद्रानाशाचा त्रास देखील कमी होतो.
९) हृदयरोग रोखण्यास उपयोगी
मखान्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण खूपच कमी असते तसेच सोडियम व फॅट्सचे प्रमाण देखील यामध्ये खूप कमी असते. हृदयरोग किंवा ह्रदयाचा काही त्रास असलेल्या व्यक्तींनी मखाने नियमितपणे सेवन केल्यास रक्तप्रवाह सुधारतो. रक्त पातळ होण्यास मदत होते त्यामुळे ब्लॉकेजेसचे प्रमाण कमी होते. कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढत नाही. हृदयरोगाचा धोका टळतो.मखाने मध्ये फायबर, प्रोटिन्स व अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. नेहमीच्या सेवनाने शरीर निरोगी राहते.
महिलांनी सशक्त राहण्यासाठी आवर्जून खावे. तसेच दररोज मखाना खाल्यामुळे त्वचाही तजेलदार होते. यात लोहाचे प्रमाण अधिक असल्यामुळे गर्भवती महिलांनी आवश्यक खावे. मखाना रात्री भिजवून सकाळी सूप किंवा सलाड मध्ये मिसळून खाऊ शकता. तुपासोबत भाजून रोज चार पाच खाऊ शकता. सगळ्या सुक्या मेव्या सोबत थोडा भाजून याची पावडर करून रोज दुधातून घेऊ शकता (makhana health benefits).
निरोगी व मजबूत आरोग्यासाठी मखाना जरूर खा.
हेही वाचा : मुलायम केसांसाठी घरगुती हेअर मास्क
जाहिरात : तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवा फक्त रु. 1999/- मध्ये
Comment here