आरोग्य

भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी वरदान

Benefits of Pumpkin Seeds | Aapli Mayboli

निरोगी आणि सशक्त आरोग्यासाठी भाजीपाला, फळभाज्या, हिरव्या भाज्या खाणे किती महत्वाचे आहे हे सर्वांना माहीत आहेच. भाज्यांमध्ये पौष्टिक गुणधर्म जास्त असल्यामुळे आहारात दररोज भाज्यांचा समावेश करणे आवश्यक आहे.

काही भाज्या, फळे यांच्या साली तसेच बियादेखील आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर असतात. त्यापैकीच एक म्हणजे भोपळ्याच्या बिया म्हणजेच pumpkin seeds. भोपळा काहींना खायला अजिबात आवडत नाही पण त्याच्या बिया मात्र आवडीने खाल्ल्या जातात. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर गुण असल्यामुळे शरीराला ते लाभदायक ठरते. (benefits of pumpkin seeds in marathi)

भोपळ्याच्या बियांचे आरोग्यासाठी फायदे

१) रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास उत्तम

रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर वेगवेगळ्या आजारास आमंत्रणच मिळते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहार गरजेचा आहे. प्रथिने, व्हिटॅमिन्स शरीरात जाणे गरजेचे आहे. त्यासाठी हिरव्या पालेभाज्या रोज खाव्यात. भोपळ्याच्या बियांमध्ये ‘व्हिटॅमिन इ’ असते जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी मदत करते म्हणून नेहमी भोपळ्याची भाजी तसेच बियांचे सेवन करावे.

२) हाडे मजबूत राहण्यास मदत

वयपरत्वे शरीरातील हाडे ठिसूळ होऊन हात, पाय सुजणे, दुखणे, चालायला न जमणे असे त्रास उदभवतात. भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते जे शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत करते. नियमितपणे भोपळ्याच्या बियांचे सेवन केल्यास हाडे ठिसूळ न होता मजबूत राहतात.

३) डायबेटीस रुग्णांसाठी pumpkin seeds उपयुक्त

लाल भोपळ्या मध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम, अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन, फायबर असते. जे शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. भोपळ्याची भाजीची चव जरी गोड असली तरी त्याच्या सेवनाने शरीरातील साखर वाढत नाही. डायबेटीस रुग्णांसाठी भोपळ्याच्या बिया या लाभदायक आहेत. म्हणून त्यांचे सेवन करावे. तसेच यांमुळे मेंदू शांत राहून ताण तणाव जाणवत नाही.

४) शरीरावरील सूज कमी होण्यास मदत

लाल भोपळ्याच्या बियांमध्ये अँटी ऑक्सिडंट्स, अँटी इंफ्लेमेंट्री असे गुणधर्म आढळतात. या गुणधर्मामुळे शरीरावरील सूज कमी होण्यास मदत होते. तसेच भोपळ्यामध्ये झिंकचे प्रमाणदेखील खूप असते. त्यामुळे शरीराच्या आतील सूज देखील भरून येण्यास व सूज दूर होण्यास मदत होते.

५) डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम

डोळ्यातील रॅटीना सुरक्षित राहण्यासाठी तसेच डोळ्याची दृष्टी जास्तीत जास्त काळ चांगली राहण्यासाठी व्हिटॅमिन ए ची गरज असते. व्हिटॅमिन ए भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात असते. या बियांच्या नियमित सेवनाने डोळ्याची दृष्टी सुधारून डोळ्यांचे आरोग्यदेखील सुधारते. मोतीबिंदू, इतर डोळ्यांच्या काही समस्या दूर करण्यासही मदत होते.

६) वजन नियंत्रित राहण्यास मदत

भोपळ्या मध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते व कॅलरीज प्रमाण कमी असते. यामुळे लवकर भूकदेखील लागत नाही. तसेच कॅलरीजचे प्रमाण शरीरात संतुलित राहते. यांमुळे वजन जास्त वाढत नाही. वजन कमी करायचे असेल किंवा आहे ते वजन नियंत्रित ठेवायचे असेल तर भोपळा, भोपळ्याच्या बिया आवर्जून खाव्यात.

७) त्वचेसाठी भोपळा फायदेशीर

भोपळ्या मध्ये अर्थात भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी असते जे कोलेजनचे उत्पादन वाढण्यास मदत करते. कोलेजन चेहऱ्यावरील त्वचेला सुरकुत्यांपासून लांब ठेवण्यास मदत करते. कोलेजन मुळे त्वचा टवटवीत व नेहमी तरुण राहते. तसेच कोलेजन जखमा भरून येण्यास मदत करते. यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असल्यामुळे चेहऱ्यावर वृद्धत्वाची लक्षणे दिसत नाहीत. चेहऱ्यावरील मुरुमे कमी होतात.

भोपळ्याच्या बियांचे तेलही त्वचेसाठी वापरले जाते. या तेलामध्ये ओमेगा , कॅरोटीन, फॅटी ऍसिड असते. ज्यामुळे पुरळ, फोड, मुरूम, काळे डाग, त्वचेची जखम यांवर प्रभावी औषध म्हणून काम करते.

८) केसांसाठी भोपळ्याच्या बियांचा वापर

भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा 3 व जस्त भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे केस वाढण्यासाठी यांचा चांगला उपयोग होतो. केस गळती, टक्कल पडण, विरळ केस अशा समस्यांवर या बिया उत्तम काम करतात. तसेच केस मजबूत बनवतात.

९) हृदयरोग प्रतिबंधक

भोपळा या वनस्पतीच्या बियांमध्ये फायबर अँटी ऑक्सिडंट्स व हेल्दी फॅट्स असतात. त्या कारणाने शरीरातील खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होते. या बियांचा नियमितपणे आहारात समावेश केल्यास शरीरात जास्त प्रमाणात कोलेस्ट्रॉल जमा होत नाही. तसेच रक्तवाहिन्या कडक होत नाहीत. यांमुळे ह्रदयाच्या विविध समस्या जसे हृदयरोग, स्ट्रोक, कोरोनरी धमनी रोग यांस प्रतिबंध बसतो.

१०) केसांसाठी उत्तम कंडिशनर

भोपळ्याच्या बियांमध्ये प्रोटीन जास्त असते. ओमेगा 3 देखील असते. कोरड्या केसांवर लाल भोपळा उत्तम कंडिशनर म्हणून काम करतो. यासाठी एक चमचा भोपळ्याचा गर, दही, अर्धा चमचा नारळाचे तेल एकत्र करून घ्या. त्यानंतर ते मिश्रण केसांना नीट लावावे. काही वेळानंतर कोमट पाण्याने केस धुवावेत. हा प्रयोग वारंवार केल्याने कोरडे केस मुलायम, चमकदार होतात.

भोपळ्याच्या बियांचा वापर

अशा या भोपळ्याच्या बियांचे औषधी गुणधर्म व अगणित फायदे आपण बघितलेच. तर या भोपळ्याच्या बियांचा वापर नेमका करायचा कसा हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. भोपळ्याच्या बिया उन्हात नीट सुकवून खाऊ शकता. या तुम्ही सुकवून साठवून ठेवू शकता. सोलून देखील खाऊ शकता. शिरा, हलवा,स्मूदी, सूप, केक अशा विविध पदार्थांमध्ये यांचा वापर करू शकता. बियांची पावडर देखील करून स्वयंपाकात वापरू शकता. (pumpkin seeds health benefits)

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here