IPL 2021 : आरसीबी आणि राजस्थान यांच्यात झालेल्या आयपीएल 2021 (आयपीएल 2021) मधील16 व्या सामन्यात विराट कोहली ची तूफान फटकेबाजी पाहायला मिळाली. विराट ने केवळ आपल्या संघाला विजय मिळवून दिला नाही तर स्पर्धेत एक नवीन विक्रमही स्थापित केला.
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेत असे स्थान गाठले आहे जेथे यापूर्वी कोणताही क्रिकेटपटू पोहोचला नाही. त्याच्या नावावर एक मोठा विक्रम नोंदविला गेला आहे.
विराटने IPL मध्ये 6000 धावा पूर्ण केल्या
आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएल स्पर्धेत 6000 धावा पूर्ण केल्या आहेत. कोहलीने आता पर्यंत 196 सामन्यात 6021 धावा केल्या आहेत. या मध्ये त्याने ५ शतके आणि ४० अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या ११३ आहे. आयपीएलमध्ये 1000 ते 6000 धावा पूर्ण करणारा पहिला खेळाडू कोण आहे ते पाहू या.
- 1000 धावा – अॅडम गिलख्रिस्ट
- 2000 धावा – सुरेश रैना
- 3000 धावा – सुरेश रैना
- 4000 धावा – विराट कोहली
- 5000 धावा – सुरेश रैना
- 6000 धावा – विराट कोहली
विराटने दिला आरसीबी ला विजय मिळवून
१७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीचे सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडिकक्कल यांच्यामध्ये नाबाद १८१ धावांची भागीदारी झाली. विराटने 72 * आणि पडिक्क्कलने 101 * धावा केल्या. यासह राजस्थान रॉयल्सविरुद्ध बंगळुरूने 10 गडी राखून मोठा विजय मिळविला.
Comment here