शिक्षण

दहावी नंतर करिअरच्या संधी

Career Opportunities after 10th in Marathi | Aapli Mayboli

दहावी बारावीच्या परीक्षांचा निकाल लागल्यानंतर आता पुढे काय ? हा प्रश्न विद्यार्थ्यां सोबत पालकांच्या मनात देखील डोकावत आहे. (career options after 10th in marathi)

साधारण पाच दहा वर्षांपूर्वीचा काळ वेगळा होता. दहावी नंतर विज्ञान, वाणिज्य, कला (आर्टस्, कॉमर्स, सायन्स) या तीन साईडपैकी एकामध्ये ऍडमिशन घ्या, बारावी करा आणि पुढे त्यातच ग्रॅज्युएशन करा किंवा मग D.ED, B.ED, Pharmacy वगैरे काही मर्यादीत पर्याय समोर असायचे ज्यात पुढे करियर करता येत होतं. जे गर्भश्रीमंत आहेत त्यांच्यासाठी इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे दरवाजे उघडे होते.

त्यावेळी करिअरच्या संधीबद्दल आतासारखी जागरूकता नव्हती त्यामुळे हे मर्यादित पर्याय सोडून काही वेगळं करता येऊ शकतं हा विचारच अस्तित्वात नव्हता. पण आता दहावीनंतर सुद्धा करिअरच्या इतक्या अफाट संधी उपलब्ध आहेत की आपल्याला ज्यात रस आहे, आवड आहे असे क्षेत्र देखील कमाईचे उत्तम साधन होऊ शकतात.

दहावीनंतर आपली आवड, आपली क्षमता, आपली जिद्द, आपले ज्ञान या जोरावर चांगले क्षेत्र निवडता येऊ शकते. सगळ्या संधींचा नीट अभ्यास करून योग्य तो निर्णय घेतल्यास भविष्य सुकर होईल व प्रगतीचे मार्ग मिळत जातील. दहावीनंतर करिअरच्या संधी :-

१) आयटीआय (ITI) अभ्यासक्रम

ज्यांना वाणिज्य, कला, विज्ञान शाखेत रस नसेल किंवा आर्थिक परिस्थिती बेताची असेल, शिक्षणानंतर लगेच रोजगार हवा असेल तर आयटीआय म्हणजे औद्योगिक प्रशिक्षण संस्था ही प्रशिक्षण संस्था आहे जिथे विविध तांत्रिक विषयांवर विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाते. कमी कालावधीत तांत्रिक शिक्षण घेऊन येथील विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. यात विविध ट्रेंड उपलब्ध असतात जसे की-

  • टर्नर
  • इलेक्ट्रिशियन
  • मेकॅनिक
  • वेल्डर
  • प्लंबर

स्वतःच्या आवडीप्रमाणे विद्यार्थी वरीलपैकी कोर्स निवडून प्रशिक्षण घेऊ शकतात. आयटीआय नंतर पुढील ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध असतात-

  • खाजगी कंपनी
  • बँकिंग क्षेत्र
  • सार्वजनिक क्षेत्र, पीडब्ल्यूडी इत्यादी
  • स्वयंरोजगार
  • परदेशात नोकरी किंवा कोर्सप्रमाणे पुढील शिक्षण देखील घेता येते.
२) पॉलिटेक्निक अभ्यासक्रम

दहावीनंतर विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स असल्यास पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो. यात देखील अनेक डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध असतात.

  • आयटी इंजिनिअरिंग
  • कंप्युटर सायन्स इंजिनिअरिंग
  • मेकॅनिकल इंजीनिअरिंग
  • टेक्सटाइल इंजीनिअरिंग
  • इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग
  • सिविल इंजिनीअरिंग
  • आयसी इंजिनीअरिंग
  • ईसी इंजिनीअरिंग
  • माइनिंग इंजिनीअरिंग

डिप्लोमा करून इंजिनिअरिंगच्या डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला प्रवेश मिळू शकतो किंवा डिप्लोमा नंतर नोकरीच्या अनेक संधी देखील उपलब्ध असतात.खाजगी कंपन्यांमध्ये चांगली नोकरी मिळू शकते. स्वतःचा बिझनेस देखील सुरू करता येऊ शकतो. स्वतःवर विश्वास असण्याची गरज आहे.

३) फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रम

बऱ्याच विद्यार्थी/ विद्यार्थिनींना कपडे, कपड्यांची डिझाइन, शिवणकला अशा कलांमध्ये रस असतो, दिवस असते त्यांना फॅशन डिझायनिंग हा उत्तम पर्याय आहे व सध्या मार्केटमध्ये जोरदार ट्रेंड मध्ये असणारा हा कोर्स आहे.

जर यात बॅचलर पदवी घ्यायची असेल तर बारावीनंतर यासाठी प्रवेश आहे पण ज्यांना डायरेक्ट दहावी नंतर फॅशन डिझायनिंग शिकायचं आहे, ज्यांना जाही आर्थिक समस्या आहेत असे विद्यार्थ्यांसाठी देखील काही प्रशिक्षण संस्था, अकॅडमी फॅशन डिझायनिंग कोर्स / प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देतात व उदरनिर्वाहासाठी त्यांना आत्मनिर्भर करतात.

ज्या मुलींना आर्थिक समस्यांमुळे इतर शिक्षण घेत येत नसेल त्यांच्यासाठी दहावीनंतर फॅशन डिझायनिंगचे अनेक कोर्स उपलब्ध आहेत जे पूर्ण करून अनेक विद्यार्थी स्वतःचा रोजगार सुरू करू शकतात. दहावीनंतर उपलब्ध असलेले फॅशन डिझायनिंग डिप्लोमा कोर्स :-

  • फॅशन डिझाईन
  • फॅशन फोटोग्राफी
  • लेदर डिझाइन
  • फुटवेअर डिझाइन
  • फॅशन तंत्रज्ञान
  • ज्वेलरी डिझाइन
  • रिटेल मर्चेंडाइझिंग
  • टेक्सटाईल डिझाईन
  • व्हिज्युअल मर्चेंडाइझिंग

तर असे अनेक डिप्लोमा दहावीनंतर उपलब्ध आहेत ज्याचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनि घेणे गरजेचे आहे. आपल्या आजूबाजूला, विविध क्लासेस मध्ये जाऊन याची चौकशी करून पूर्ण माहिती काढून तुम्ही तुमच्या आवडत्या क्षेत्रात करियर करू शकता. आवडीचे क्षेत्र असेल तर प्रगती आपसूकच होते. ज्यांना डिझायनिंग आवडत असेल त्यांनी नक्की हे कोर्स करण्याचा प्रयत्न करावा.

४) मेकअप आणि ब्युटीशियन कोर्स

ज्या विद्यार्थ्यांना मेकअप, कॉस्मेटोलॉजि, ब्युटी, सौंदर्य यात आवड असेल त्यांच्यासाठी दहावी नंतर मेकअप आणि ब्युटीशीयन क्षेत्रात शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्राबद्दल अनेकांना माहिती नसते पण आता या क्षेत्रात नोकरीच्या व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.

मेकअप आर्टिस्ट, कॉस्मेटोलॉजिस्ट बनण्यासाठी दहावीनंतर डिप्लोमा कोर्सेस देखील उपलब्ध आहेत. डिप्लोमा नंतर याच क्षेत्रात पुढील शिक्षण घेऊन बॅचलर पदवी देखील प्राप्त करता येते. वेगळी वाट निवडून आपल्या आवडीला आपलं करियर बनवण्यासाठी, यश प्राप्तीसाठी हे एक उत्तम करियर पर्याय असू शकते.

५) फाईन आर्टस्/ परफॉर्मिंग आर्टस्

अनेक विद्यार्थी शालेय जीवनापासूनच कलाप्रेमी असतात. चित्रकला, कार्यानुभव असे विषय त्यांच्या अगदी आवडीचे असतात. इतर विषयांशी त्यांचं सूत फारसं जुळत नाही व दहावी/ बारावीनंतर जबरदस्ती इतर विषयात मन रमवायचा प्रयत्न जरी केला तरी मनासारखं करियर घडत नाही.

म्हणून ज्यांना आर्टस्, क्राफ्ट मध्ये प्रचंड आवड आहे त्यांनी आर्टस् अँड क्राफ्टस, डान्स, सिरॅमिक अँड पॉटरी, ड्रॉईंग,इंटिरिअर डिझाइन,स्कल्प्चर आर्ट, म्युजिक, ग्राफिक डिझाइन, ऍनिमेशन इत्यादी सारख्या क्षेत्राचा करियर म्हणून विचार करावा. यात दहावीनंतर कोर्स उपलब्ध आहेत त्याचा अभ्यास करून योग्य ते करियर निवडावे व प्रगती करावी.

आयुष्यातील एक चुकीचा निर्णय पुढील सगळे भविष्य तडजोडीच्या मार्गावर नेते म्हणून दहावी/ बारावी या महत्वाच्या वर्षानंतर वेळ घेऊन, शांतपणे विचार करून, आपल्यातील क्षमतेला ओळखून, सुप्त गुण जाणून करियरचा महत्वपूर्ण निर्णय घ्यावा.

आताच्या काळात अनेकानेक संधी करियरचे दरवाजे बनून खुले झाले आहेत त्यांचा नीट अभ्यास करून निर्णय घेणे आवश्यक आहे. हे कोर्सेस करून स्वतःचा उद्योग सुरू करून उद्योजक देखील होता येते.
आजच्या लेखात दिलेल्या या कोर्सेसचा नक्की विचार करून निर्णय घ्या. इतर अनेक करियर संधी आपण पुढील लेखात पाहणारच आहोत.
Best luck…!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here