आरोग्य

चाळिशीनंतर स्त्रियांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी

Health Tips for Womens after Fourty | Aapli Mayboli

स्त्री घराची, कुटुंबाची सर्वेसर्वा असते. नवरा, मुलं, सासू, सासरे, नातेवाईक, आप्तेष्ट असा घराचा डोलारा ती एकटी सांभाळत असते. घरासोबत ती स्वतःची नोकरी, उद्योग देखील तितक्याच सक्षमतेने सांभाळत असते. पण स्वतःपेक्षा अधिक लक्ष तिचं तिच्या घराकडे व कुटुंबाकडे असते. जबाबदारी आणि कर्तव्ये यांची पूर्तता करत स्वतःकडे ती दुर्लक्षच करते आणि याचे परिणाम तिला तिच्या शरीरावर चाळीशी नंतर दिसू लागतात.

चाळीशी नंतर बहुतेक महिलांना अनेक आरोग्य विषयक समस्या उदभवू लागतात. मणक्याचा त्रास, संधिवात, हाडे ठिसूळ होणे, रक्त कमी होणे, अशक्तपणा जाणवणे, ह्रदयाचे रोग, स्ट्रोक, कॅन्सर, मधूमेह असे अनेक विकार वयाच्या चाळिशीनंतरच डोकं वर काढतात. या काळात शरीरातील शक्ती कमी होत असते. (womens health tips after fourty in marathi)

सतत काम करत असलेल्या शरीराला आरामाची गरज असते. हे अधून मधून डोकं वर काढणारे आजार “आता जरा थांब” अस सांगत असतात. अशा वेळीच धोक्याची घंटा समजून घेऊन स्वतःकडे व स्वतःच्या शरीराकडे आवर्जून लक्ष देणे गरजेचे आहे. (womens health precautions after age of fourty in marathi)

चाळीशी नंतर महिलांनी आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. काय खावे व काय खाऊ नये हे माहीत असणे आवश्यक आहे. आहार योग्य असला की इथून पुढील कोणत्याही काळात नवीन आजार जडण्याची शक्यता कमी असते. आजच्या लेखात महिलांनी चाळिशीनंतर स्वतःची काळजी कशी घ्यावी हे पाहणार आहोत. (health tips for womens after age of fourty in marathi)

१) कॅल्शियमची कमतरता

चाळीशी नंतर शरीरातील लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन, प्रथिने, फॉलिक ऍसिड यांची कमतरता भासते. त्यामुळे शरीराची झीज होते. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ होतात. या वयात कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी दुधाचे पदार्थ अधिक खावेत.

दूध, तूप, लोणी, ताक, पनीर, दही इत्यादी सेवन करावे. तसेच हिरव्या पालेभाज्या, राजिगरा, अंडी, मासे, सुकामेवा, नाचणी, तीळ, राजमा, कडीपता, पुदिना, सोयाबीन, गाजर, शेवगा अशा पदार्थांचा आहारात समावेश करावा. सकाळी कोवळ्या उन्हात बसावे. आहारासोबत व्यायामही करावा.

२) व्हिटॅमिन B12

व्हिटॅमिन B12 सगळ्यांना माहीत आहेच की स्त्रियांसाठी किती महत्वाचे असते. B12 मुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते व मेंदूची कार्ये सुरळीत पार पाडतात. B12 वाढण्यासाठी स्त्रियांनी अंडी, मटण, मासे व दुधाच्या पदार्थांचे अधिक सेवन करावे.

त्याचप्रमाणे आहारात तंतुमय पदार्थांचा वापर करावा. सॅलड, फळे, भाज्या, कडधान्ये, अंकुर येणाऱ्या डाळी, मेथ्या इत्यादी खावे. जास्तीत जास्त म्हणजे 8 ग्लास पाणी प्यावे. किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम अवश्य करावा.

३) व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी हे शरीरातील कॅल्शियम शोषण्यास मदत करते. व्हिटॅमिन डी हाडांच्या आरोग्यसोबतच दातांसाठी देखील आवश्यक आहे. व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते व रक्तवाहिन्या मजबूत करण्यात मदत करते.

व्हिटॅमिन डी कमतरतेमुळे हृदयविकार, मधुमेह,स्तनाचे रोग , कर्करोग, मेंदू संबंधी व त्वचेसंबंधी रोग उदभवतात. व्हिटॅमिन डीच्या सेवनासाठी मासे, अंडी, गाईचे दूध,मशरूम, धान्ये, तृणधान्ये, दुग्धजन्य पदार्थ यांचा आहारात समावेश करावा.

४) मॅग्नेशियम

सतत शरीराला थकवा जाणवत असेल, पाय दुखत असतील, पायाला गोळे येत असतील, अशक्तपणा जाणवत असेल, पेटके येत असतील,मळमळ, उलटी, बधिरपणा जाणवत असेल तर शरीरातील मॅग्नेशियमची पातळी खालावली आहे असे समजून जावे. स्त्रियांच्या बाबतीत चाळिशीनंतर हे त्रास जास्त प्रमाणात होतात. सतत पाय, कंभर दुखणे, अशक्तपणा जाणवणे असे त्रास उदभवतात. याचे कारण एकच असते ते म्हणजे शरीरातील मॅग्नेशियम कमी झालेले असते.

मॅग्नेशियम वाढण्यासाठी मॅग्नेशियम युक्त आहार करावा जसे, ज्वारीची भाकरी, केळी, ओट्स, डाळी, पालक, हिरव्या पालेभाज्या,सुका मेवा, बदाम, अक्रोड,बाजरी, नाचणी,मोड आलेली कडधान्ये, सॅलड यांचा आहारात समावेश करावा. मॅग्नेशियमची पातळी संतुलित असल्यास साखरेची पातळी व रक्तदाब संतुलित राहतो.

५) फॉलिक ऍसिड

रक्तक्षय, हृदयरोग, कर्करोग यासारखे आजार उदभवू नये म्हणून शरीरात फॉलिक ऍसिडचे प्रमाण योग्य असणे गरजेचे आहे. यासाठी फळे, सुकामेवा, खजूर,हिरव्या पालेभाज्या, गूळ, शेंगदाणे, डाळी, शेपू, बीट, गाजर, ज्वारी, बाजरी, मासे,मटण इत्यादीचा समावेश आहारात असणे आवश्यक आहे.

तसेच मासे, अंडी, जवस, ऑलिव्ह ऑईल यांचाही आहारात समावेश असल्याने यातून ओमेगा 3 व ओमेगा 6 फॅटी ऍसिड मिळते व हृद्यरोगासारख्या रोगांपासून संरक्षण मिळते.

चाळिशीनंतर स्त्री शारिरीक व मानसिक स्तरावर लढत असते. शरीरात बरेच बदल होत असतात व त्याचा परिणाम मनावर देखील होत असतो. मानसिक संतुलनासाठी नियमित व्यायाम व योगा करावा. संगीत ऐकावे. ज्या गोष्टीतून आनंद मिळतो, समाधान मिळते असे छंद, आवडी निवडी जोपासाव्या. स्वतःला आवडते त्या कामात अधिकाधिक गुंतवून ठेवावे. नियमित व्यायाम, रोज 8 ते 10 ग्लास पाणी व पौष्टिक आहार घेतल्यास कोणत्याही वयात आरोग्य सुदृढ राहते. चाळीशी नंतर वरती सांगितल्याप्रमाणे स्त्रियांनी स्वतःला वेळ देऊन स्वतःकडे लक्ष द्यावे व स्वतःची काळजी घ्यावी. निरोगी राहावे.
Stay Healthy and Happy fourty😊

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here