मनोरंजन

अभिनेता सुयश टिळक अडकणार विवाहबंधनात, आयुषी भावे सोबत केला साखरपुडा

Suyash Tilak Got Engaged | Aapli Mayboli

मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध आणि तुमच्या आमच्या सर्वांचा आवडता अभिनेता सुयश टिळकने त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. सुयश टिळकचा नुकताच साखरपुडा संपन्न झाला आहे. का रे दुरावा, बापमाणूस, दुर्वा, शुभमंगल ऑनलाईन या आणि अशा अनेक मालिकांमधून केलेल्या उत्कृष्ट अभिनयाद्वारे सुयश टिळक महाराष्ट्रातील घराघरांत पोहचला आहे. म्हणूनच चॉकलेट बॉय अशी ओळख असलेल्या सुयशचे चाहते खूप प्रमाणात आहेत.

सुयश आणि आयुषीचा साखरपुडा
आम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की सुयश टिळकने 6 जुलै रोजी आयुषी भावे सोबत साखरपुडा केला आहे. आयुषी बद्दल बोलायच झालं तर आयुषी ही 2018 ची महाराष्ट्राची श्रावण क्वीन किताबाची मानकरी ठरलेली आहे. तसेच आयुषीने युवा डान्सिंग क्वीन या टेलिव्हीजन शो मध्ये भाग घेतला होता. सुयश टिळक आणि आयुषी भावे या दोघांचा साखरपुडा हा साऊथ इंडियन पद्धतीने संपन्न झालेला आहे. महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या दिवशी (6 जुलै) साखरपुडा संपन्न झाला त्या दिवशी आयुषीचा वाढदिवस होता. वाढदिवसाचं औचित्य साधून आणि साऊथ इंडियन पद्धतीचा पोशाख परिधान करून काही ठराविक मित्र-परिवारासोबत या दोघांनी थाटामाटात साखरपुडा केला आहे.

सोशल मिडिया द्वारे दिली गोड बातमी
सुयश आणि आयुषी या दोघांच्या साखरपुडयाचे काही फोटो सोशल मिडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्या फोटोंमध्ये सुयश आणि आयुषी या दोघांची जोडी खूपचं सुंदर दिसत आहे. स्वत: सुयश ने ही गोड आनंदाची बातमी सोशल मिडिया अकाऊंटवरून चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

सुयश टिळक बद्दल बोलायचं झालं तर सुयशने का रे दुरावा, सख्या रे, बापमाणूस, दुर्वा इ. मालिका आणि क्लासमेट्स, तिचा उंबरठा, कॉफी आणि बरचं काही, खाली पिली, इ. चित्रपटात काम केले आहे. सुयश सध्या शुभमंगल ऑनलाईन या कलर्स मराठीवरील मालिकेत सायली संजीव सोबत काम करत आहे.

आपली मायबोली टीमकडून सुयश टिळक आणि आयुषी भावे या जोडीचं खुप खुप अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी खुप सार्‍या शुभेच्छा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comments (1)

Comment here