मनोरंजन

सोनी मराठीवर ‘अजूनही बरसात आहे’ प्रेमाची

Ajunahi Barsat Ahe | Aapli Mayboli

तुमच्या आमच्या प्रत्येकाचचं पावसासोबत लहानपणापासूनचं एक वेगळचं नातं असतं आणि म्हणूनचं पाऊस आपल्याला हवाहवासा वाटतं असतो. त्यात सध्या पावसाचे दिवस असल्याने वातावरणात मस्त छान गारवा आहे. अधून मधून मनसोक्त बरसणारा पाऊस आपल्याला खूप काही आठवणी देऊन जातो. मग त्या आठवणींचा पाऊस आपल्या मनात बराच वेळ बरसत राहतो. खरं तर आपल मन कधीपासूनचं त्या पावसात चिंब भिजण्यासाठी तयार झालेलं असतं.

मग हळूच हृदयाच्या एका खोल कप्प्यात बंद करून ठेवलेलं आणि पहिल्या पावसात बहरलेलं पहिलं प्रेम नकळत आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं आणि आपण त्या प्रेमाच्या आठवणीत मग्न होऊन जातो. मग पुन्हा सगळ्या आठवणी जाग्या होतात आणि सुरू होते प्रेमरूपी पावसाची बरसात. अशीच प्रेमाची बरसात येत आहे तुम्हाला भेटायला येत्या 12 जुलै पासून सोनी मराठीवर “अजूनही बरसात आहे” या मालिकेद्वारे सोमवार ते शनिवार रात्री 8:00 वाजता.

हेही वाचा : सोन्याची पावलं – येत आहेत कलर्स मराठीवर

प्रेमाला कुठं असते Expiry Date

अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत

‘अजूनही बरसात आहे’ या सोनी मराठी वाहिनीवरील मालिकेत आपल्याला मुख्य भूमिकेत दिसणार आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील आपले लाडके कलाकार उमेश कामत आणि मुक्ता बर्वे. खूप दिवसांनंतर दोघेही टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. या मालिकेत उमेश कामतने आदिराज नावाचे तर मुक्ता ने मीरा नावाचे पात्र साकारले आहे.

आदिराज आणि मीरा हे दोघेही आपल्याला डॉक्टरच्या भूमिकेत पहायला मिळणार आहेत. मीरा आणि आदिराज हे दोघे 10 वर्षापूर्वी एकमेकांच्या खूप प्रेमात होते पण काही गैरसमजुतीमुळे ते वेगळे झालेले असतात. 10 वर्षांनंतर पुन्हा एकदा अचानकपणे ते दोघे एकमेकांसमोर येतात आणि सुरू होतो मग एक वेगळाच प्रवास. या प्रवासात मीरा आणि आदिराजला हवी आहे तुमची साथ.

बेस्ट पेक्षा बेटर काही नसतं

अभिनयाची पोचपावती म्हणजे उमेश आणि मुक्ता ने केलेले चित्रपट

अभिनेता उमेश कामत बद्दल बोलायचं झालं तर उमेश ने या आधी असंभव, शुभम करोती, एका लग्नाची दुसरी गोष्ट, ऋणानुबंध, आणि काय हवं, इ. मालिकांमध्ये आणि बाळकडू, टाइम प्लीज, पुणे व्हाया बिहार, लग्न पहावे करून, असेही एकदा व्हावे, अ पेईंग घोस्ट, ये रे ये रे पैसा, इ. चित्रपटात काम केल आहे.

अभिनेत्री मुक्ता बर्वे अग्निहोत्र, लज्जा, मधु इथे अन चंद्र तिथे, आभाळमाया, घडलयं बिघडलयं, इ. मालिकांमध्ये आणि मुंबई पुणे मुंबई, एक डाव धोबीपछाड, जोगवा, सावर रे, गोळा बेरीज, बदाम राणी गुलाम चोर, लग्न पहावे करून, मंगलाष्टक वन्स मोअर, हायवे एक सेल्फी आरपार, डबल सीट, इ. चित्रपटात झळकली आहे.

‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेचे शीर्षक गीत खूपच सुंदर असून ते देवकी पंडित आणि स्वप्निल बांदोडकर यांनी गायलं आहे. या शीर्षक गीताला अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केल असून या शीर्षक गीताच्या गीतकार रोहिणी निनावे या आहेत.

हेही वाचा : अभिनेता सुयश टिळक अडकणार विवाहबंधनात, आयुषी भावे सोबत केला साखरपुडा

अचानकपणे समोर आल्यानंतर मीरा आणि आदिराज एकमेकांचा तिरस्कार करतील की 10 वर्षापूर्वीचं त्यांचं प्रेम पुन्हा बहरणार ? आणि बहरलचं तर कशी असेल त्यांच्या प्रेमाची बरसात ? हे सर्व माहित करून घेण्यासाठी पहायला विसरू नका ‘अजूनही बरसात आहे’ सोनी मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री 8:00 वाजता.

जाहिरात : तुमच्या व्यवसायाची वेबसाईट बनवा फक्त रु. 1999/- मध्ये

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here