मनोरंजन

सोन्याची पावलं – येत आहेत कलर्स मराठीवर

Sonyachi Pawal | Aapli Mayboli

मराठी टेलिव्हीजनच्या विश्वात कायमचं वेगवेगळा आशयघन असलेल्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. नशीब आणि प्रेमाची गोष्ट सांगणारी एक नवीन मालिका कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

भाग्याची गोष्ट सांगणारी सोन्याची पावलं

सोन्याची पावलं असं या मालिकेचं नाव असून या मालिकेतून भाग्यावर आधारलेली प्रेमाची गोष्ट प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. या मालिकेचे प्रोमोज सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत. 5 जुलै पासून सोमवार ते शनिवार संध्या. 6:30 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ज्योती निमसे आणि आदित्य दुर्वे ची नवीन जोडी

सोन्याची पावलं या मालिकेतून ज्योती निमसे आणि आदित्य दुर्वे ही नवखी जोडी प्रेक्षकांना लवकरच पहायला मिळणार आहे. या मालिकेतून आदित्य दुर्वे पहिल्यांदाच मालिका विश्वात पहायला मिळणार आहे तर ज्योतीने या आधी “तुझ्या इश्काचा नाद खुळा” या स्टार प्रवाह वरील मालिकेमध्ये शिल्पा नावाचे पात्र साकारले होते. सोन्याची पावलं या मालिकेची निर्मिती अभिनेत्री सई देवधर आणि दिग्दर्शिका श्रावणी देवधर यांनी केली आहे.

मध्यम वर्गीय कुटुंबातील महत्त्वकांक्षी व कष्टाळू मुलगी

एका छोट्याशा गावामध्ये मध्यम वर्गीय कुटुंबात लहानाची मोठी झालेली भाग्यश्री ही खुप महत्त्वकांक्षी व कष्टाळू मुलगी असते. “आपल्यामुळे इतर लोक नेहमी आनंदात कसे राहतील” हाच विचार भाग्यश्रीच्या मनात असतो. “आपण आपलं काम करत रहायचं, कधी ना कधी त्या कामाचं चांगलं फळ मिळतचं” हे सूत्र घेऊन भाग्यश्री आपलं आयुष्य मनापासून आनंदात जगत असते. पण नियतीला कदाचित हे मान्य नसावं म्हणूनचं की काय भाग्यश्री दहा वर्षांची होती तेव्हा तिची आई वारली. एकट्या पडलेल्या आपल्या मुलीला आईचं प्रेम मिळावं म्हणून भाग्यश्रीच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं खर पण सावत्र आईकडून तिला कधी प्रेम मिळालचं नाही, मिळाला तो फक्त सावत्र आईचा जाच. सावत्र आईच्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी भाग्यश्रीच्या समोर एकचं मार्ग होता, तो म्हणजे लग्न.

इनामदार घराण्याचं शेंडेफळ

अत्यंत हुशार, देखणा, धाडसी, इतरांना नेहमी चांगले सल्ले देणारा, फक्त एका हाकेवर कधीही मित्रांच्या मदतीला धावणारा, लोकांना मदत करायला सदैव तत्पर असा हा दुष्यंत इनामदार म्हणजे इनामदारांच्या घराण्यातील शेंडेफळ. दुष्यंत मध्ये असलेल्या या चांगल्या सवयींमुळे एके दिवशी त्याची भाग्यश्री सोबत ओळख होते आणि सुरू होते नशीब आणि प्रेमाची गोष्ट.

सोन्याची पावलं या मालिकेचे प्रोमोज तर खुपचं छान आहेत आणि तुम्हाला पण ते नक्कीच आवडले असतील. तसेच आम्हाला हेही माहीत आहे की सोन्याची पावलं ही मालिका पाहण्यासाठी तुम्हीही खुप उत्सुक आहात.

काय असेल नियतीच्या मनात ? सावत्र आईच्या जाचातून भाग्यश्री कशी करून घेईल स्वत:ची सुटका ? इनामदारांचं शेंडेफळ अर्थात दुष्यंत करणार का भाग्यश्री सोबत लग्न ? कशी असेल नशीब आणि प्रेमाची गोष्ट ? या सर्व आणि अशा बर्‍याचं प्रश्नांची उत्तरे माहीत करून घेण्यासाठी पहायला विसरू नका 5 जुलै पासून सोमवार ते शनिवार संध्या. 6:30 वाजता सोन्याची पावलं कलर्स मराठी व वूट ॲप वर.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comments (1)

Comment here