मनोरंजन

जीव माझा गुंतला – कलर्स मराठी वरील नवीन मालिका

Jeev Majha Guntala | Aapli Mayboli

जीव माझा गुंतला” हे ऐकायला जरी चांगलं वाटतं असलं तरी मित्रांनो माझा जीव कोणामधेही गुंतलेला नाही बरं का. तर “जीव माझा गुंतला” हे कलर्स मराठी या चॅनल वर येणार्‍या नवीन मालिकेचे नाव आहे. आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे 21 जून पासून सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता कलर्स मराठी या चॅनल वर “जीव माझा गुंतला”.

जीव माझा गुंतला – एका अबोल प्रीतीचा एक रांगडा बाज

अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौगुले मुख्य भूमिकेत

“जीव माझा गुंतला” या कलर्स मराठी वरील मालिकेत मुख्य भूमिकेत आपल्याला दिसणार आहेत अभिनेत्री योगिता चव्हाण आणि अभिनेता सौरभ चौगुले. “जीव माझा गुंतला” या मालिकेत योगिता चव्हाण ने अंतरा नावाच्या मुलीची भूमिका केली आहे जी सर्व सामान्य कुटुंबातील असून रोजगार मिळावा म्हणून ऑटो रिक्षा चालवते. तर सौरभ चौगुले ने मल्हार नावाच्या मुलाची भूमिका केली आहे जो एका श्रीमंत कुटुंबातील मुलगा असून तो एका कॅब कंपनीचा मालक आहे.

अभिनेत्री योगिता चव्हाणचा सहज-सुंदर उत्कृष्ट अभिनय

अभिनेत्री योगिता चव्हाण बद्दल बोलायचं झालं तर योगिताने या आधी “गावठी” या मराठी चित्रपटात मुख्य नायिकेची भूमिका केली आहे. या चित्रपटात तीने “गौरी” नावाच्या सोज्वळ मुलीची भूमिका केली आहे. “गावठी” हा चित्रपट २०१८ साली प्रदर्शित झाला होता. तसेच योगिताने सोनी मराठी या चॅनल वरील “नवरी मिळे नवर्‍याला” या मालिकेत सुद्धा काम केले आहे. योगिता चव्हाण चा सहज-सुंदर असा केलेला उत्कृष्ट अभिनय प्रेषकांच्या मनात कायम लक्षात राहण्यासारखा असतो. तर अभिनेता सौरभ चौगुले खर्‍या आयुष्यात इंजिनिअर असून अभिनयाची व रंगभूमीची आवड असल्यामुळे या क्षेत्रात काम करत आहे.

अंतरा आणि मल्हार ची प्रेमकहाणी म्हणजेच “जीव माझा गुंतला”. अंतरा आणि मल्हार मधील एक संवाद जो की “जीव माझा गुंतला” च्या प्रोमो मध्ये पहायला मिळतो.

अंतरा : गाडी पार्क केलीये की चेष्टा ? रिक्षा कशी निघणार हो.
मल्हार : आम्ही अशीच पार्क करतो. तुम्ही निघा ना दुसरी रिक्षा घेऊन…… आता ३ चाकी चालवणारे शिकवणार ४ चाकी कशी पार्क करायची ते.
अंतरा : ४ चाकी पंक्चर झाली ना की ३ चाकीलाच हात दाखवतात अतिशहाणे लोकं….. लय बोललात…. चला वाट मोकळी करा.

तेव्हा मित्रांनो नक्की कोणाचा जीव कोणामध्ये गुंतला हे पहायला विसरू नका सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता कलर्स मराठी व वूट ॲप वर.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here