तंत्रज्ञान

यूट्यूबवरचे व्हिडिओ डाउनलोड करण्याच्या काही महत्त्वपूर्ण पद्धती

Tricks To Download YouTube Videos | Aapli Mayboli

मित्रांनो आपल्याला आज-काल हवी असलेली कोणतेही माहिती यूट्यूब वर व्हिडिओ च्या स्वरुपात उपलब्ध आहे. यूट्यूब वर असंख्य प्रकारचे असंख्य व्हिडीओज आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही कोणताही विषय घ्या यूट्यूब तुम्हाला अगदी चुटकी सरसी त्या विषयाचे व्हिडीओज तुमच्या समोर पाहण्यासाठी उपलब्ध करून देते. आपणही लगेच उपलब्ध झालेले व्हिडीओज पहायला सुरुवात करतो.

पण मित्रांनो तुम्ही कधी याचा विचार केला आहे का जर तुमचं इंटरनेट कनेक्शन काही कारणाने बंद झाले किंवा भविष्यात तो व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पहायचा असेल तर तो तुम्ही कसा पाहणार. मित्रांनो जर तुम्ही तो व्हिडिओ डाउनलोड केलेला असेल तर तुम्ही कधीही आणि कितीही वेळा तो व्हिडिओ पाहू शकता ते पण इंटरनेट कनेक्शन नसताना सुद्धा. म्हणूनच आपण आजच्या या लेखामध्ये यूट्यूबवरचे व्हिडिओ डाउनलोड कसे करायचे (How to download YouTube videos without any software) हे माहीत करून घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी कोणत्याही सॉफ्टवेअर ची गरज लागणार नाही.

चला तर मग पाहुयात यूट्यूबवरचे व्हिडिओ डाउनलोड करण्याच्या पद्धती (Tricks to download YouTube videos) :

1. youtubemultidownloader.net या वेबसाईटचा वापर करून

👉 मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला जो व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे त्या व्हिडीओची लिंक यूट्यूब वरुन कॉपी करायची आहे.

👉 त्यानंतर तुम्हाला https://youtubemultidownloader.net ही वेबसाईट उघडायची आहे. वेबसाईट उघडल्यानंतर खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे तुमच्या समोर वेबपेज दिसेल.

YouTube Video Download | Aapli Mayboli
👉 तुमच्या समोर असलेल्या वेबपेज वरील “Link” या पर्यायासमोरील बॉक्स मध्ये तुम्ही यूट्यूब वरुन कॉपी केलेली लिंक पेस्ट (Paste)करायची आहे. लिंक पेस्ट केल्यानंतर लगेचच तुमच्या समोर वेगवेगळे डाउनलोड चे फॉरमॅट उपलब्ध असतील जसे की MP4 Format, Audio, WebM आणि 3GP.

👉 उपलब्ध असलेल्या MP4 Format मधील 720P हे लिहीलेल्या बटणावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ सहजपणे डाउनलोड करू शकता.

👉 मित्रांनो संपूर्ण प्लेलिस्ट डाउनलोड करायची असेल (how to download complete playlist from YouTube) तर यूट्यूब प्लेलिस्ट ची लिंक कॉपी करा आणि वरील वेबसाईट च्या Playlist या पर्यायावर क्लिक करा आणि कॉपी केलेली यूट्यूब प्लेलिस्ट लिंक पेस्ट करा. तुमच्या समोर यूट्यूब प्लेलिस्ट वरील सर्व व्हिडिओ डाउनलोड साठी उपलब्ध असतील. Download च्या पर्यायाखालील MP4 720P हे लिहीलेल्या बटणावर क्लिक करून तुम्ही एक एक व्हिडिओ डाउनलोड करू शकता.

2. ss या शॉर्टकोड चा वापर करून (Download YouTube videos using ss)

👉 मित्रांनो जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात त्या व्हिडिओ च्या ॲड्रेस बार मधील लिंक मध्ये https://www. च्या जागी तुम्हाला ss टाईप करून कीबोर्ड वरील एंटर बटन दाबायचे आहे.

👉 एंटर बटन दाबल्यानंतर तुमच्या समोर आपोआप savefrom.net ही वेबसाईट उघडेल ज्यावर व्हिडिओ डाउनलोड चाDownload MP4 720हा पर्याय असेल. त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करू शकता.

उदा. तुमच्या व्हिडीओची लिंक https://www.youtube.com/watch?v=abcxyz अशी आहे तर या लिंक च्या https://www. च्या जागी ss टाईप करून नवीन लिंक याप्रमाणे दिसेल ssyoutube.com/watch?v=abcxyz

👉 जर तुम्हाला ss या शॉर्टकोड चा वापर करायचा नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला जो व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे त्याची लिंक यूट्यूब वरुन कॉपी करायची आहे. त्यानंतर savefrom.net च्या https://en.savefrom.net या वेबसाईट वर जाऊन तुमच्या समोर असलेल्या टेक्स्टबॉक्स मध्ये कॉपी केलेली लिंक पेस्ट (Paste)करायची आहे. त्यानंतर तुमच्या समोर डाउनलोड चा पर्याय उपलब्ध होईल.

मित्रांनो या पद्धतीने तुम्ही यूट्यूबवरील व्हिडिओ डाउनलोड करू शकता. या लेखातील सर्व माहिती शैक्षणिक हेतूच्या उद्देशाने लिहिली आहे. तरी कोणीही त्याचा गैरवापर करू नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here