इतर

उत्तम जीवनशैली कशी असावी

How to make a good Lifestyle | Aapli Mayboli

देवाने माणसाला बनवले. ही देवाची सर्वांत सुंदर कलाकुसर केलेली मुर्ती म्हणावे लागेल. कारण या एकाच मुर्तीत त्याने राग, द्वेष, अहंकार, कला, चांगल्या वाईट गुणांचा दागिना चढविलेला आहे. यामुळेच आपण आपल्याला प्रत्येकापासून वेगळे आहोत हे समजते.

उत्तम माणुस कसा असावा हे राहु दे बाजुला आधी आपण माणुस म्हणुन तरी नीट जगतो का आधी विचार करा. आत्ताच्या या शर्यतीच्या दुनियेत, प्रत्येकजण एक मशिन म्हणुन जगत आहे. ज्याला त्याला पुढे जायचे आहे. जो तो आपण कसे श्रेष्ठ याचाच विचार करुन वागत आहे. मग ते वागणे योग्य आहे की अयोग्य याचाही विचार करत नाही. खरचं आपण चांगला माणूस म्हणून आपण जगतो का…? (How to have a good lifestyle in marathi)

आपण आपले जगणंच विसरून चाललो आहोत

प्रत्येकजण एक वैशिष्टयपूर्ण जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तो अपार कष्ट करतो. कष्टांची पराकाष्टा करतो. हे वाईट नाही. पण हे करताना आपण जगणेच विसरुन जातो. आपणांस वाटते की, आपण लहान होतो तेव्हा वाटते की, आपण मोठे व्हावे आणि मोठे झाल्यावर वाटते की आपण लहान होतो तेच बरे होते.

शाळेत असताना आपण प्रार्थना म्हणायचो आठवते का ….? खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे…. त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींची लिहीलेली ही प्रार्थना किती छान आहे. ऋषीमुनी, संत, लेखक, कवी यांनी त्यांच्या ज्ञानातून किती सहज, सोप्या भाषेत जीवन जगण्याचे सार सांगितले आहेत. पण आपण कधी या गोष्टी समजूनच नाही घेतल्या.

खरं पाहता प्रत्येक माणूस या जगात वावरत असताना त्याच्याभोवती जे घडत, त्याच्या बरोबर जे होत त्यावरुन प्रत्येक माणूस तयार होतो. त्याची विचार करण्याची पध्दत, किंवा जगण्याच्या पध्दतीवर परिणाम होतो. हेच कारण आहे की, माणूस घडण्यात आणि बिघडण्यात. हळुहळु हिच त्याची जीवनशैली होऊन जाते आणि आपण एक वेगळेच आयुष्य जगायला सुरुवात करतो किंवा आपण आत्ताही तेच आयुष्य जगतोय.

माणुसकीचा खरा पाया ओळखायला शिका

उच्च जीवनशैली, पैसा म्हणजे सर्वस्व नाही. उच्च विचार, योग्य नितीमत्ता आणि योग्य आचरण हा माणुसकीचा खरा पाया आहे. या पायांवर जो उभा रहायला शिकला. तोच खरा जगायला शिकला.

माणुसकी म्हणजे काय…? म्हटलं तर साध्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर माणसाने माणसाशी माणसासम वागणे. किती सोप आहे हे. पण हे आपल्याला कळत नाही वाटतं. कारण प्रत्येकजण धर्म, जाती, द्वेष, भाषा या चौकटीत अडकलेला आहे. या चौकटीत राहूनच आपण विचार करतो. तो अमुक धर्माचा, अमुक जातीचा आहे, त्याची भाषा वेगळी आहे. त्याचा प्रांत वेगळा आहे यावरुन आपण प्रत्येक माणसाला लेखायला सुरुवात करतो.

समोरील व्यक्तीही एक माणुस आहे हे ही आपण विसरतो. खरं म्हणायचे झाल्यास आपण प्रत्येकजण कुठेना कुठेतरी, नकळत माणुसकी विसरत चाललो आहे. या दगदगीच्या जीवनशैलीत आपले संस्कार, आपला परिवार, आपले मित्र-मैत्रीण हे कुठे तरी काळाच्या ओघात हरवून जात आहेत. याचेही आपल्याला भान राहिले नाही.

आपण कोणत्या भ्रमात जगतो आहोत

खरंच आपण असे आहोत का ? का आपण आपल्यालाच एक उत्तम माणूस म्हणून समजतो ? याचा विचार कधी केलाय का? केला नसेल तर तो प्रत्येकाने करावा. काळाच्या ओघात आपण काय हरवले आहे हे जाणून घ्या. का कोणास ठाऊक आपण कोणत्या भ्रमात असतो त्यापेक्षा आपण कोणत्या भ्रमात जगतो कधी विचार केलाय का ?

कनिष्ठांनी वरिष्ठांशी कसे वागले पाहिजे किंवा वरिष्ठांनी कनिष्ठांशी कसे वागले पाहिजे हे त्या व्यक्तीवरील संस्कार सांगून जातात. या धावपळीच्या आयुष्यात कामाचा ताण येणे, चिडचिड होणे साहजिक आहे पण याचवेळी आपल्या नितीमत्ता, बुध्दीमत्ता याचा कस लागतो.

माणुस आणि माणुसकी – एकाच नाण्याच्या दोन बाजु

एकमेकांचा आदर करणे, एकमेकांची भावना जपणे. एखाद्याचं दुःख दुर करता आले नाही तरी चालेल पण एखाद्याला आपल्यामुळे दु:ख होईल, त्रास होईल असे न वागणे. ही तर खरी माणुसकी आहे. माणुस आणि माणुसकी या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. पण माणसातील माणुसकी हरवत चालली आहे. माणुसकीची जागा द्वेष, अहंकार यांनी घेतली आहे.

आपल्या डोळ्यावर आपण द्वेष, अहंकार याची पट्टी चढवलेली आहे. यामुळेच आपल्याला माणसातला माणुस दिसत नाही. ज्यावेळी आपल्या डोळ्यावरील अहंकार, द्वेष याची पट्टी बाजुला करु. त्यावेळीच आपल्याला माणसातला माणुस दिसेल आणि खऱ्या अर्थाने आपण माणूस म्हणून जगू.

आपण या जगात जन्माला येताना काही घेऊन आलो नाही आणि या जगातून जाताना काही घेऊन जाणार नाही. आपण या जगातून गेल्यावर लोकांच्या लक्षात राहते ती आपली माणुसकी. शेवटी काय आपण… माणसाने माणसाशी माणसासम वागणे.
– स्वप्नील संजय खोपडकर

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here