इतर

सण समारंभासाठी घरीच करा परफेक्ट मेकअप

How to do Professional Makeup | Aapli Mayboli

आता लग्नसराई, सण समारंभ सुरू झाले आहेत. हल्ली सण समारंभ म्हणजे जंगी फंक्शन असतं. लग्न असल्यावर तर सलग चार पाच दिवस मेहंदी, संगीत वगैरे वगैरे कार्यक्रम चालूच असतात. प्रत्येक दिवशी नवीन ड्रेस, साडी व त्यावर खुलून दिसण्यासाठी सर्वात महत्वाचा मेकअप तर गरजेचाच आहे. पूर्ण कार्यक्रमात आपली छाप पडावी, आपण सुंदर दिसावं, उठून दिसावं असं प्रत्येक मुलीला, स्त्रीला वाटत असतेच. त्यातून सोशल मीडियावर फोटो अपडेट करायचे असतात मग या सगळ्यासाठी फक्त तुमचा ड्रेस किंवा साडीच भारी असून चालत नाही.

चेहरा उठावदार दिसण्यासाठी मेकअप हा अत्यंत म्हणजे अत्यंत गरजेचा आहे. पण आता दररोज पार्लर मध्ये जाणे शक्य असते का ? जाणे शक्य झाले तरी ते परवडते का ? शिवाय तो मेकअप नीट होईल का ? फार भडक होईल का ? ती सौंदर्य प्रसाधने आपल्या चेहऱ्याला सूट होतील का? त्याने चेहऱ्याला परत काही परिणाम होईल का? असे बरेच बरेच प्रश्न मनात घोळत राहतात . (professional makeup tips and tricks in marathi)

घरच्या घरीच करा परफेक्ट मेकअप

त्यापेक्षा जर सण समारंभासाठी घरीच परफेक्ट मेकअप करता आला तर ???? हो हे तर प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं नाही का की घरीच एकदम छान मेकअप जमावा म्हणजे सारखे सारखे पार्लरमध्ये जायची गरज भासणार नाही. तर आज हे स्वप्न पूर्ण होईल. आज आपण या लेखात तुम्ही कार्यक्रमासाठी, लग्नासाठी घरच्या घरी उत्तम मेकअप कसा करावा किंवा स्टेप बाय स्टेप मेकअप घरी कसा करावा हे पाहणार आहोत. (easy and simple makeup tips in marathi)

मेकअप – एक कला

मेकअप म्हणजे फक्त फाउंडेशन, लिपस्टिक, काजळ, आय लायनर लावलं की झालं असं होतं नाही. ती एक कला आहे जी सरावाने उत्तम जमू शकते. मेकअप केला तरी नैसर्गिक मेकअप वाटला पाहिजे अशा प्रकारे मेकअप करणे हीच महत्वाची कला आहे व यातील बारकावे लक्षात ठेवून व चुका दुरुस्त करून सराव केला की या कलेत तुम्ही नक्कीच पारंगत होऊ शकता. (how to do makeup at home in marathi)

मेकअप करताना स्टेप बाय स्टेप केला की चुका होत नाहीत व मेकअप भडक होत नाही किंवा काही वेळाने मेकअप काळाही पडत नाही. मेकअप करण्याआधीची सर्वात महत्वाची पायरी म्हणजे जी सौंदर्य प्रसाधने वापरणार आहेत किंवा प्रॉडक्ट्स जसे प्रायमर, फाउंडेशन हे चेहऱ्याला सूट होतील तीच घ्यावीत. (त्याची टेस्ट आधी करणे गरजेचे आहे.) (professional bridal makeup)

स्टेप बाय स्टेप घरच्या घरी परफेक्ट मेकअप

१) मॉइश्चरायझर (Moisturiser)

मेकअप करण्याआधी चेहरा सवच धुवून घ्यावा. चेहऱ्याला टोनर लावावे. मेकअप करण्याआधी सर्वात महत्वाचे आहे की त्याचा बेस तयार करणे. बेस म्हणजे एक गुळगुळीत पदर किंवा पाया की ज्यावर तुमचा मेकअप नीट बसेल, जास्त काळ टिकेल, भडक दिसणार नाही, नंतर काळाही पडणार नाही आणि मेकअप नैसर्गिक देखील दिसेल. तर हा बेस अत्यंत महत्वाचा आहे म्हणून यासाठी जी उत्पादने वापरणार ती उत्तम गुणवतेची असावी. बेस चांगला व्हावा यासाठी प्रथम मॉइश्चरायझर लावणे गरजेचे आहे. मॉइश्चरायझर चेहरा चांगला हायड्रेटेड ठेवते व चेहऱ्याचे संरक्षण करते. यानंतर जी उत्पादने मेकअप साठी वापरणार ती त्वचेत मिसळायला मदत करते. म्हणून चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेणे.

२) प्रायमर (primer)

मॉइश्चरायझरनंतर आणि फाउंडेशनच्या आधी ही महत्वाची पायरी आहे. प्रायमर संपूर्ण चेहऱ्याला व्यवस्थित लावून घेणे. प्रायमर मुळे मेकअप नीट बसतो व महत्वाचं म्हणजे जास्त काळ टिकतो त्यामुले प्रायमर लावणे गरजेचे आहे.

३) कन्सिलरने डाग लपवणे (Concealer)

फाउंडेशनच्या आधी किंवा नंतरही कन्सिलर तुम्ही करू शकता. आपल्या चेहऱ्याच्या रंगानुसार कन्सिलर निवडावे. मूळतः कन्सिलर तुमच्या चेहऱ्यावरील डाग, व्रण, डोळ्याखालील काळे डाग, नाक व नाकाच्या शेजारी, हनुवटी या ठिकाणी जिथे त्वचा जरा काळी दिसते, काहींना वांग असतो अशा ठिकाणी कन्सिलर व्यवस्थित लावून घ्यावे. कन्सिलर परफेक्ट लावले तर मेकअप नैसर्गिक दिसण्यास मदत होते यासाठी स्वतःच्या स्किन टोनला मॅच होईल असंच कन्सिलर निवडणे. डागाच्या ठिकाणी कधीही फाउंडेशन डायरेक्ट लावू नये नाहीतर मेकअप केल्यानंतर काही काळाने चेहरा काळवंडतो. कन्सिलरची स्टेप चुकवू नये.

४) फाउंडेशन (Foundation)

आता स्किन मेकअप साठी नीट तयार झाली की आपण फाउंडेशन कडे वळणार आहोत. फाउंडेशन देखील विविध रंगामध्ये मिळते त्यातील आपल्या चेहऱ्याच्या रंगाला मिळता जुळता रंग निवडावा व फाउंडेशन त्वचेमध्ये नीट मिसळणारे असावे. पावडर, द्रव स्वरूपात फाउंडेशन मिळते. फाउंडेशन नीट चेहऱ्यापासून मानेपर्यंत व्यवस्थित लावून घ्यावे. चेहरा व मान वेगळी दिसू नये यासाठी मानेपर्यंत फाउंडेशन व्यवस्थित पसरवून घ्यावे. फार भडक किंवा पांढरे दिसणार नाही याची काळजी घ्यावी.

५) कॉन्टरींग, ब्लश, हायलाईट (Contour, Blush, Highlight)

कॉन्टरींग, ब्लश, हायलाईट या तीन स्टेप्स सोप्या असल्यातरी त्या नाजूकतेने परफेक्ट जमणे गरजेचे आहे. या तीन स्टेप्स मुळे तुमचा चेहरा कोरीव दिसतो त्यामुळे हे काम कोरिवपणे करावे. चेहऱ्याचे कटिंग करून घ्यावे म्हणजे कॉन्टरींग. यासाठी कटिंग पेन्सिल किंवा कॉन्टरींग पेन्सिल मिळते. कपाळाच्या दोन बाजू, कानाखालून सरळ खाली गालांवर कॉन्टरींग करून घ्यावे. त्याच्या ब्रशने ते नीट डॅप करून घ्यावे. डोळ्याखालील भागात, कपाळावर, हनुवटीवर हायलाईट करून घ्यावे. यानंतर गालांवर ब्लश लावुन व वरच्या दिशेने ब्रश फिरवत ते नीट चेहऱ्यामध्ये मिसळून द्यावे. या तिन्ही स्टेप्स चेहऱ्यामध्ये मिसळणे गरजेचे आहे. वरच्या वर कटिंग केलंय असे दिसता कामा नये तरच मेकअप पूर्णपणे नैसर्गिक दिसेल.

६) डोळ्यांचा मेकअप ( Eye Makeup)

सर्वात आधी आयब्रो पेन्सिल वापरून भुवया नीट करून घ्याव्यात. ज्या रंगाची साडी, ड्रेस असेल तो आयशँडो वापरून ब्लेंडिंग ब्रशने नीट मिसळून घ्यावा . यानंतर आयलायनर व मस्कारा लावून घ्यावा. काजळ पेन्सिलने काजळ लावावे. डोळ्यांचा मेकअप फक्त इतकाच असा असला तरी त्यात करण्यासाठी खूप आहे. खूप रेखीवपणे आयशडो, आयलायनर वापरून ( विविध रंगाचे) हा मेकअप अधिक आकर्षित करता येतो. इथे तुमची सर्जनशीलता दाखवण्यास भरपूर वाव असतो.

७) लिपस्टिक (Lipstick)

सर्वात शेवटी ओठांचा मेकअप करावा. तुमच्या एकूणच लुकला ओठांचा मेकअप पूर्ण करतो. ओठाच्या मेकअपसाठी प्रथम लिप लायनर ओठांच्या कडांना लावून घेणे. आवडता रंगाची किंवा साडीझ ड्रेसला मॅचिंग अशी लिक्विड मॅट लिपस्टिक ओठांना लावावी. फार भडक वाटत असल्यास टिशू पेपरने हलकेस पुसून घ्यावे जेणेकरून ओठांचा रंग नैसर्गिक दिसेल. ओठांच्या बाहेर लिपस्टिक गेली नाही याची खात्री करून घ्यावी. शक्यतो तुमचा चेहरा उजळ दिसेल अशाच रंगाची लिपस्टिक निवडावी.

तर आता तुमचा परफेक्ट असा मेकअप झाला आहे यानंतर फक्त एक पण अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट करायची आहे ती म्हणजे मेकअप सेट राहावा, जास्त काळ टिकाव यासाठी त्यावर किंचितशी सेटिंग पावडर लावावी. तसेच मेकअप सेटिंग स्प्रे मिळतो काही अंतरावरून स्प्रे करावा.

आता उत्तम मेक-अप सहित सण समारंभासाठी जाण्यासाठी तुम्ही तयार आहात. तर या स्टेप्स व टिप्स वापरून नक्की मेक-अप करा व सुंदर दिसा, सुंदर राहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here