प्रेरणादायीमनोरंजन

पिच्चर – आयफोन वर चित्रित केलेला पहिला मराठी चित्रपट

Pichchar - Aapli Mayboli

मित्रांनो जिद्द, चिकाटी व मेहनत करण्याची तयारी असेल तर माणूस काहीही करू शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाई मधील दिगंबर वीरकर. चित्रपटाचे कोणतेही व्यावसायिक प्रशिक्षण न घेता दिगंबर वीरकर यांनी चक्क आयफोन वर “पिच्चर” हा मराठी चित्रपट शूट केला आहे.

प्रयत्न वाळूचे कण रगडीता तेलही गळे

चित्रपट बनवण्याचं वेड दिगंबर वीरकर यांना काही केल्या शांत बसू देत नव्हतं. काहीही झालं तरी चित्रपट बनवायचाचं आहे हा विचार सारखा त्यांच्या मनात येत होता आणि इथूनचं प्रवास सुरू झाला पिच्चर या आयफोन वर चित्रित केलेल्या पहिल्या वहिल्या मराठी चित्रपटाचा.

वीरकर मोशन पिक्चर्स” निर्मित, “राही प्रॉडक्शन” यांच्या सहयोगाने आणि “दिगंबर वीरकर” दिग्दर्शित “पिच्चर” हा मराठी चित्रपट MX Player या OTT प्लॅटफॉर्म वर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

“गरीब व हलाखीच्या परिस्थिती मध्ये आयुष्यातील पूर्ण करण्यासाठीची धडपड व केलेल्या संघर्षाची कहाणी” लेखकाने या चित्रपटाद्वारे खूप छान पद्धतीने मांडली आहे. खर्‍या अर्थाने आपल्या दररोज च्या आयुष्यातील एक खरं वास्तव आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळतं.

“आयुष्यात कितीही मोठी संकटं आली तरी सुद्धा ध्येय पूर्ण झाल्याशिवाय थांबायचं नाही” याचा प्रत्यय हा चित्रपट पाहिल्या नंतर येतो.

दिगंबर वीरकर यांचा पिच्चर हा पहिलाचं चित्रपट असून त्यांनी कथा, पटकथा, निर्माता, दिग्दर्शक, संकलक अशा सर्व बाजू लिलया पेलल्या आहेत. चित्रपटातील सर्व कलाकार नवखे असूनही सर्वांनी आपापल्या भूमिका उत्तमरीत्या पार पाडल्या आहेत. जगदीश चव्हाण, ऐश्वर्या शिंगाडे, राम गायकवाड, महेश आंबेकर, अंकिता नरवणेकर, गणेश वीरकर, कुशाल शिंदे, महेश्वर पाटणकर, सीमा नाईक, सोनाली विभुते, सीमा वर्तक, रविकिरण दिक्षित, अविनाश धुळेकर, इ. नवोदित कलाकारांनी या चित्रपटात अभिनय केला आहे. केदार दिवेकर यांनी या चित्रपटाला पार्श्वसंगीत दिलं आहे तर निखिल लांजेकर यांनी साऊंड डिझाईन केलं आहे. पिच्चर या चित्रपटाचे शूटिंग सातारा, वाई व बावधन या परिसरात झालं आहे.

खाली दिलेल्या MX Player या OTT प्लॅटफॉर्मच्या लिंक ला जाऊन तुम्ही हा चित्रपट मोफत पाहू शकता.
https://www.mxplayer.in/movie/watch-picchar-movie-online-f91388f3f0067f5a777363ad03c2d74e

मित्रांनो संकटांना घाबरू नका. आयुष्यात आलेली सर्व संकटे ही आपली आयुष्याच्या शाळेतील परीक्षा घेण्यासाठीचं आलेली असतात. आपण किती धाडसी, कणखर व मेहनती आहोत ते त्यांना पहायचं असतं. त्यामुळे संकटांवर अशा पद्धतीने तुटून पडायचं की आपली सर्व स्वप्नं पूर्ण झालीचं पाहिजेत.

लेखन, दिग्दर्शन, संकलन, निर्मिती या आपल्या अंगी असलेल्या कला गुणांनी स्वत:चं एक वेगळं विश्व निर्माण करणार्‍या दिगंबर वीरकर यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here