पर्यटन

आपलं खडकवासला – एक आगळा वेगळा सेल्फी पॉईंट

Khadakwasla Selfie Point - Aapli Mayboli

हल्ली जिकडे फिरायला जाईल तिकडे तिकडे सेल्फी काढून पोस्ट करण्याची जणू पद्धतच निघाली आहे मग ते हॉटेल असो, प्रार्थनास्थळ असो वा कोणतं पर्यटन स्थळ सेल्फी काढून पोस्ट करण्यात एक वेगळीच क्रेझ आहे. असाच एक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे खडकवासला चौपाटीवरील आगळा वेगळा असा “आपलं खडकवासला ” हा सेल्फी पॉईंट.

अलीकडेच खडकवासला धरणाच्या चौपाटीवर एक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे. “आपलं खडकवासला ” असं ठेक्यात सांगणारा हा सेल्फी पॉईंट पर्यटकांचा केंद्रबिंदू बनला आहे. सिंहगडला जाता जाता धरणावर उतरणारे पर्यटक या सेल्फी पॉईंटवर सेल्फी काढल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत. हा नयनरम्य सेल्फी पॉईंट खडकवासला गावचे विद्यमान सरपंच श्री. सौरभ (नाना) जयसिंग मते यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आला आहे. इथून मागे खूप सारे सेल्फी पॉईंट पाहिले मग ते शहरांचे असो किंवा एखाद्या मॉल चे, पण हा पहिलाच सेल्फी पॉईंट आहे जो एका गावात उभारण्यात आला आहे.

या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन 14 जून रोजी बारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. ताईंनी या सेल्फी पॉईंटचे ट्विटरवरून देखील कौतुक केले आहे व युवा सरपंच सौरभ मते यांचे अभिनंदन केले आहे. या आगळ्या वेगळ्या सेल्फी पॉईंटला आकर्षक विद्युत रोषणाई ची जोड देण्यात आली आहे. संध्याकाळच्या वेळी धरणाच्या पाण्यात प्रतिबिंबीत होणारे याचे रंग-बिरंगी दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे आहे. इतर वेळी पर्यटक आपला विकेंड, चौपाटीवरील भुट्टा, भेळ असे अनेक पदार्थ खाऊन, पाण्यात खेळून, साजरा करतात. पण सेल्फी पॉईंट वर फोटो काढून तो सोशल मीडिया वर पोस्ट करण्याची आगळीवेगळी कल्पना नक्कीच ट्रेंडिंग होणार आहे.

मित्रांनो वाट कसली पाहताय…चला “आपलं खडकवासला ” सोबत सेल्फी काढूया…!

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here