सामान्य ज्ञान

व्यक्तिमत्त्व आकर्षक करण्याचे उपाय

Personality Development Tips | Aapli Mayboli

शिक्षण, नोकरी, कौटुंबिक जबाबदार्‍या या सगळ्यांमध्ये अधोरेखित होत असतं ते आपलं व्यक्तिमत्त्व. सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की, व्यक्तिमत्त्व ही खर्चिक बाब नाही, तर त्याचा प्रत्येक पैलू हा स्वप्रयत्नातून विकसित होत असतो.

चला मग पाहुयात असे काही उपाय ज्याचा वापर करून तुम्ही तुमचं व्यक्तिमत्त्व आकर्षक करू शकता

चांगले वर्तन आणि सकारात्मक विचारसरणी

एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व त्याच्या बाह्य रूपावरून दिसून येत असते, पण त्याही पेक्षा अधिक त्या व्यक्तीचे इतरांशी वर्तन आणि विचारसरणी कशी आहे, या वरूनही ठरत असते. दिसायला आकर्षक, पण जर विचारसरणी स्वार्थी असेल तर अशा व्यक्तींची लोकप्रियता फार काळ टिकून राहत नाही. त्यामुळे रूपासोबतच वर्तन व विचारसरणी कशी आहे यावरही इतरांचे तुमच्याबद्दलचे मत अवलंबून असते

चांगल्या वर्तनामुळे आणि सकारात्मक विचारसरणीने आत्मविश्वास वाढण्यासाठी मदत होते. तसेच अशा व्यक्तीचा मित्र परिवारही मोठा असतो आणि या सर्वांचा सकारात्मक परिणाम व्यक्तीच्या कार्यक्षमतेवरही होत असतो.

नकारात्मक मतं व्यक्त करणे टाळणे

आपण काम करत असलेल्या ठिकाणी किंवा घरांमध्ये देखील इतरांबद्दल नकारात्मक मते व्यक्त करणे टाळायला हवे. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाविषयी तक्रार असेलच तर तो प्रश्न शक्यतो सामोपचाराने परस्परांशी बोलून सोडवावा. तसेच त्याविषयी इतरांशी वारंवार चर्चा करणे टाळायला हवे. प्रत्येक गोष्टीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा.

अडचणीतून मार्ग काढणे

एखादी अडचण उद्भवल्यास त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत बसण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढता येईल हे पाहावे आणि तशी मदत आवश्यक असल्यास इतरांनाही करावी. ज्या व्यक्ती मानसिक आधार देणार्‍या, टोकाची मते व्यक्त न करणार्‍या आणि मदतीस तत्पर असतात अशा व्यक्तींचा आधार इतरांना जास्त वाटत असतो.

काहीतरी नवीन करत रहा

सतत काहीतरी नवीन करून पाहण्याची आवड असणार्‍या उत्साही हसतमुख मंडळींचा सहवास नेहमीच आनंद देणारा ठरतो. अशा व्यक्ती सतत काहीतरी नावीन्यपूर्ण करण्यासाठी इतरांना देखील प्रेरणा देत असतात.

सामंज्यसपणा

बोलण्यात नेहमी सामंज्यस असावे. त्यातून संवाद सुरळीत होण्यास मदत होते. बोलताना नजर स्थिर ठेवणे आवश्यक आहे. त्यातून तुम्ही ठोसपणे बोलत आहात असा विश्वास मिळतो. जे बोलणार आहात ते आत्मविश्वासाने बोला, जेणेकरून आपले बोलणे अधिक स्पष्ट होईल.

प्रसंगावधान

हसताना प्रसंगावधान असणे आवश्यक आहे. त्यातून तुमची गांभीर्यता दिसून येते. पेहराव करताना तो आपल्याला साजेसा आहे की नाही याचा अंदाज घेतला पाहिजे जेणेकरून तुम्ही इकडे तिकडे वावरताना कम्फर्टेबल असाल.

सहनशीलता व दुबळेपणा ला झटकून टाका

सहनशीलता व दुबळेपणा आकर्षक व्यक्तिमत्त्वाला मारक ठरतात. आपल्याला कोणत्याही परिस्थितीत कोणीही गृहीत धरता कामा नये. यासाठी नेहमी काळजी घेतली पाहिजे. स्वत:चे आकर्षक व्यक्तिमत्त्व तयार करणे किंवा घडवणे ही एका दिवसात होणारी गोष्ट नाही, पण हळूहळू एक एक पाऊल पुढे टाकले पाहिजे.

ठरवलेल्या गोष्टीत सातत्य ठेवा

नव्याचे नऊ दिवस असे म्हटले जाते, त्यामुळे काही गोष्टी ठरवल्या की थोडे दिवस त्याचे आचरण करायचे आणि नंतर पुन्हा जुन्याच गोष्टी रेटत राहायच्या अशी मानसिकता कधीही वाईटच असते. त्यामुळे स्वत:साठी ठरवलेल्या सकारात्मक गोष्टी अमलात आणण्याकडे नेहमी कल पाहिजे.

व्यक्तिमत्त्व हे वयावर अवलंबून नसते. फक्त स्वत:वर विश्वास, स्वत:बद्दल प्रेम आणि प्रसन्नता असेल तर कोणत्याही वयात आपण अॅक्टिव्ह राहू शकतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here