सामान्य ज्ञान

थोडं आहे, थोडं अजून गरजेचं आहे

Importance of Mutual Understanding | Aapli Mayboli

तो आणि ती दोघंही करिअर करणारे. नोकरी, कामाच्या वेळा आणि रोजची दगदग यात एकमेकांसाठी वेळ काढणं कठीण. त्यात सगळ्याच गोष्टींचा प्रॅक्टिकल विचार करता करता नात्याचाही ‘मोस्ट प्रॅक्टिकल’ विचार होऊ लागला आहे. त्यातूनच मग गैरसमज होतात आणि कळत नकळत नातं हातून कधी निसटून जातं हे कळतच नाही. असं होऊ नये म्हणून या काही टीप्स. साध्या सोप्या गोष्टी. कारण नातं टिकवायचं, निभावून न्यायचं तर त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करायला हवेत.

नात्याला वेळ द्या

तो आणि ती मधलं नातं फुलावं, विकसित व्हावं असं वाटतं असेल तर त्याला नात्याला क्वालिटी वेळ देणं फार गरजेचं आहे. रोज रात्री कमीत कमी अर्धा तास आणि महिन्यातून कमीत कमी एक आख्खा दिवस असा असला पाहिजे जो फक्त दोघांचाच असेल.

एकमेकांना सांगून व्यवहार करा

दोघंही कमावणारे असले आणि दोघांचीही बँकेची खाती निरनिराळी असली तरी कोण, कशावर, किती आणि कशासाठी खर्च करतोय हे दुसर्‍याला माहीत असायलाच हवं.

नातं जपायला शिका

एकमेकांचं ऐका. एकमेकांना बोलायला वेळ द्या. फक्त स्वत:च बोलत बसू नका. गरज असेल तिथे एकमेकांना पाठिंबा द्या. तसंच एकमेकांचं कौतुक करा. नात्याच्या स्वास्थ्यासाठी या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात.

एकमेकांना समजून घ्या

अनेकदा कळत नकळत नात्यांमध्ये इतका कोरडेपणा आणि रुक्षता येते की एकमेकांकडे कुठल्या कारणाखेरीज बघून हसायलाही विसरायला होतं. एकमेकांना इतकं गृहीत धरलं जातं की एकमेकांच्या भावनाही समजून घ्यायला वेळ देण्याची गरज वाटेनाशी होते. असं होऊ देऊ नका. नुसतं एकमेकांकडे बघून हसल्यानेही अनेकदा एकमेकांमध्ये असणारा ताण आपोआप नाहीसा होतो.

गोष्टी मनात ठेऊ नका, व्यक्त व्हा

दुसर्‍याची एखादी गोष्ट खटकली, आवडली नाही तर लगेच तिथल्या तिथे बोलून मोकळे व्हा. मनात ठेऊन कुढत बसू नका. त्यानं काहीही होत नाही. उलट नात्यामध्ये विनाकारण तेढ निर्माण होते. ज्यातून पुढे मनं कलुषित व्हायला वेळ लागत नाही.

एकमेकांशी मनमोकळेपणाने बोला

एकमेकांना समजून घ्यायलाच हवं. पण म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की समोरच्याला तुमच्या मनात काय चाललेलं आहे ते न सांगता कळेल. त्यामुळे एकमेकांशी बोला. न बोलता सगळं समजावं अशी अपेक्षा अवाजवी आहे. तुम्हाला काय हवं आहे, तुमची काय अपेक्षा आहे ते स्वच्छपणे सांगा म्हणजे मग गैरसमज आणि गोंधळ कमी होतो आणि अपेक्षा पूर्ण व्हायला मदत होते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.