आरोग्य

गुलाब पाण्याचे फायदे, गुलाब पाणी बनवा घरच्या घरी

Benefits of Rose Water | Aapli Mayboli

तुमच्या घरी बागेत देशी गुलाब किंवा गावठी गुलाबाची झाडं असतील तर तुम्ही नशीबवान आहात. का म्हणून काय विचारताय. देशी गुलाबाचा सुगंध अप्रतिम तर असतोच शिवाय यापासून बनवलेले गुलाब पाणी तुमच्या सौंदर्यासाठी खूप गुणकारी असते. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवायचे असेल, चिरतरुण राहायचे असेल तर घरात गुलाब जल/ गुलाब पाणी असायलाच पाहिजे.

बाजारात विविध प्रकारचे गुलाब पाणी मिळते पण त्याच्या शुद्धतेची शंभर टक्के गॅरंटी कोणीच देऊ शकत नाही. पण घरच्या घरी गुलाब पाणी बनवल्यास ते पूर्णपणे शुद्ध असते व त्याचे कोणतेही दुष्परिणाम आपल्या त्वचेवर होत नाहीत याची गॅरंटी असते. हे सर्व ठीक आहे पण हे गुलाब पाणी बनवायचे कसे? तर या प्रश्नाचे उत्तर अगदी सोप्पे आहे (how to make rose water at home).

गुलाब पाणी बनवण्याची कृती :-

१) देशी गुलाब किंवा गावठी गुलाब किंवा सुगंधी गुलाबाची फुले गोळा करावी.
२) देठापासून पाकळ्या वेगळ्या कराव्यात.
३) गुलाबाच्या पाकळ्या सर्व प्रथम कोमट पाण्याने धुऊन घ्यावी जेणेकरून धूळ वगैरे जमा झाली असल्यास निघून जाईल.
४) एक लिटर पाण्यात या पाकळ्या घालून हे पाणी सुरुवातीला गॅसवर मध्यम आचेवर उकळवावे.
५) पाणी उकळल्यावर गॅस कमी करावा. पाकळ्यांचा रंग हळूहळू कमी होईल. पाकळ्यांचा रंग पूर्णपणे बदलला की गॅस बंद करून पाणी थंड होऊ द्यावे.
६) पाणी थंड झाले की पाकळ्या बाजूला काढून हे पाणी गाळून एखाद्या हवाबंद बाटलीत किंवा भांड्यात भरून ठेवावे. फ्रिजमध्ये देखील साठवू शकता.
७) साधारण आठवडाभर हे पाणी चांगले टिकते.
८) घरच्या घरी अशा पद्धतीने सहज गुलाब पाणी बनवून त्वचेसाठी, केसांसाठी वापरायला सुरू करू शकता.

गुलाब पाण्याचे फायदे

निसर्गाने दिलेले वरदान म्हणजे गुलाब पाणी. हे अँटी ऑक्सिडंट्स असल्यामुळें अनेक समस्यांवर उपयोगी ठरते. उत्कृष्ट नैसर्गिक सौंदर्य उत्पादन म्हणून गुलाब पाणी वापरू शकता. (Rose water benefits)

१) चेहऱ्याची चमक वाढवणे

दररोजच्या धकाधकीच्या जीवनात प्रदूषणामुळे, अनेक सौंदर्य उत्पादनामुळे, ऋतूंच्या बदलामुळे चेहरा कधी काळवंडतो, निस्तेज पडतो, तजेलदारपरणा निघून जातो अशा वेळी गुलाब पाणी अत्यंत उत्तम रीतीने काम करते. रोज सकाळी संध्याकाळ चेहरा गुलाब पाण्याने स्वच्छ केल्यास चेहऱ्यावरील धूळ निघून जाते. चेहरा आतून स्वच्छ होतो. तसेच चेहऱ्यावर ओलावा टिकून राहतो. त्यामुळे चेहरा निस्तेज न दिसता फ्रेश दिसतो. सुंदर दिसतो. काळवंडत नाही.

विशेष करून उन्हाळ्यात चेहरा उन्हामुळे जास्त खराब होतो, थकतो. अशा वेळी उन्हाळ्यात नेहमी गुलाब पाण्याची बॉटल सोबत ठेवावी. ठराविक तासांनी चेहऱ्यावर स्प्रे बॉटलने हे पाणी शिंपडावे म्हणजे चेहरा तजेलदार दिसून टवटवीत राहण्यास मदत होते. ब्लॅकहेड्स जमा होत नाहीत.

२) मेकअप रिमूव्हर म्हणून उपयोग

बाहेर पडताना किंवा कार्यक्रमासाठी मेकअप करणे गरजेचेच असते. पण वेळेत मेकअप उतरवणे देखील आवश्यक असतात नाहीतर त्याचे दुष्परिणाम चेहऱ्यावर दिसू लागतात. बाहेरील मेकअप रिमूव्हर वापरण्यापेक्षा घरचा नैसर्गिक रिमूव्हर वापरल्याने चेहरा स्वच्छही होतो व कोणताही दुष्परिणाम होत नाही. गुलाब पाणी मेकअप रिमूव्हर म्हणून वापरू शकता. कापसाच्या बोळ्यावर आवश्यक तेवढे गुलाब पाणी घेऊन हलक्या हाताने चेहऱ्यावरील मेकअप पुसून घ्याच व त्यानंतर चांगल्या फेसवाँशने चेहरा धुवून घ्यावा.

३) डोकेदुखी मिनिटात दूर

गुलाब पाण्याचे फक्त त्वचे संबंधी फायदे नसून इतर बऱ्याच समस्यांवर ते गुणकारी औषध म्हणून काम करते. गुलाब पाणी थंड असते. डोकेदुखीचा त्रास बऱ्याचदा सगळ्यांना उदभवतो. नेहमी गोळ्या खाणे देखील योग्य नसते. गुलाब यावर उपयोगी ठरते. अरोमा थेरपी मध्ये गुलाब पाणी व गुलाब तेलाचा वापर डोकेदुखीपासून मुक्तता देण्यासाठी केला जातो. गुलाब पाण्यात भिजवलेला रुमाल किंवा कॉम्प्रेस काही वेळ डोक्यावर ठेवल्याने डोकेदुखी कमी होते तसेच गुलाब पाण्याची वाफ घेतल्यानेही डोकेदुखी पासून आराम मिळतो.

४) डोळ्यांना आराम

कॉम्प्युटरवर, मोबाईलवर सतत काम केल्याने डोळ्यांना त्रास होतो. डोळे दुखतात व जळजळतात. काहीवेळा डोळ्यांना इन्फेक्शन होते. डोळ्यांची आगआग होते. आयुर्वेदात डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुलाब पाण्याचा उपयोग सांगितला आहे. डोळ्यांच्या वरील समस्या जाणवल्यास गुलाब पाण्यात कापसाचा बोळा भिजवून तो बंद डोळ्यांवर १५ मिनिटे ठेवावा. गुलाब पाणी शीत असते, त्यात अँटी ऑक्सिडंट्स गुणधर्म असल्याने डोळ्यांना शांतता मिळते. ओलावा मिळतो. जळजळ, आग होणे दूर होते. धुळीने डोळे लाल झाले असतील तर त्यात दोन तीन थेंब गुलाब पाणी टाकावे. डोळे स्वच्छ होतात. गुलाब पाणी अँटी डिप्रेसेंट म्हणून उत्तम काम करते.

५) तेलकट त्वचेसाठी फायदेशीर

गुलाब पाणी प्रत्येक त्वचा प्रकारासाठी अत्यंत फायदेशीर आहे. चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी गुलाब पाण्याचा उपयोग करतात. गुलाब पाणी पीएच बॅलन्स करते. तेलकट त्वचा असल्यास चेहऱ्यावर छिद्रे, मुरुमे, डाग अशा समस्या उदभवतात. तेलकट त्वचा असणाऱ्यांनी दिवसातून एकदा तरी गुलाब पाणी चेहऱ्याला लावावे. गुलाब पाण्याने चेहरा धुवावा. चेहरा स्वच्छ होऊन छिद्रे हळूहळू कमी व्हायला मदत होते. मुरुमे, डाग नाहीसे व्हायला मदत होते. यातील अँटीऑक्सिडंट्स गुणधर्मामुळे त्वचेतील पेशी मजबूत बनतात व चेहरा कोरडा होत नाही. चेहरा तेलकट होत नाही. गुलाब पाणी चेहऱ्यासाठी मॉइश्चरायझर म्हणून चांगले काम करते.

६) जखम भरून येण्यास मदत

गुलाब पाणी मध्ये अँटी बॅक्टेरिअल गुणधर्म असतात त्यामुळे कोणतीही जखम’चट्टे, बर्न्स गुलाब पाण्याने लवकर भरून येण्यास मदत होते. इन्फेक्शन होत नाही. त्वचा चिरतरुण राहते.

७) केस मजबूत होतात

गुलाब पाणी केवळ त्वचेसाठी उपयोगी न राहता केसांच्या आरोग्यासाठी देखील ते एक वरदान ठरले आहे. कोरडे केस, कुरळे केस, तुटणारे केस यांवर गुलाब पाणी उत्तम औषध आहे. गुलाब पाणी केसांना लावले असता कोरडे केस मऊ होतात. केसांना पोषण मिळून केस मजबूत होतात. सुगंधी होतात. केसांमधील कोंडा व तेलकटपणा कमी करून केस चमकदार, मुलायम बनवते. केस धुतल्यानंतर केसांना गुलाब पाणी लावावे.

८) क्लिंजर, टोनर म्हणून उत्तम

गुलाब पाणीमध्ये अँटी ऑक्सिडंट्स, अँटी इंफ्लेमेंटरी, अँटी बॅक्टेरियल अँटी एजिंग गुणधर्म आढळून येतात. याने चेहऱ्याला पोषण मिळते. चेहऱ्यावर बाहेरील अतिरिक्त उत्पादने वापरण्यापेक्षा नैसर्गिक गुलाब पाणी वापरणे केव्हाही चांगले. चेहऱ्याची गुलाब पाणी क्लिंजर, टोनर, मॉइश्चरायझर म्हणून उत्तमरीत्या काम करते. रोज रात्री चेहऱ्यावर गुलाब पाणी लावून झोपू शकता. सुरकुत्या, निस्तेज चेहरा या समस्यांपासून सुटका होते.

गुलाब पदार्थांची चव देखील वाढवते त्यामुळे गुलाबजाम, लस्सी, खीर,लाडू, मिल्कशेक अशा विविध पदार्थांमध्ये गुलाब पाण्याचा वापर लेला किंवा गुलाब पाकळ्या देखील वापरल्यास पदार्थ आकर्षक तर दिसतातच शिवाय चविष्ट देखील होतात. तसेच गुलाब पाणी पचनाचे विकार देखील दूर करते (benefits of rose water in marathi).

गुलाबाला काटे जरी असले तरी गुलाबाचे फुल सुंदर, आकर्षक व आपल्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत औषधी उत्पादन आहे. तर इथून पुढे झाडाला आलेले गुलाब फेकून न देता त्याचे गुलाब पाणी नक्की बनवा व आपले निरोगी सौंदर्य खुलवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर नक्की करा.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख मिळवण्यासाठी आमच्या सोशल माध्यमांना फॉलो करा : फेसबूक | ट्विटर | इंस्टाग्राम

AapliMayboli.com या संकेतस्थळाला भेट द्या आणि “ आपली मायबोली ” वरील सर्व लेख वाचण्याचा आनंद घ्या.

“ आपली मायबोली ” चे सर्व लेख टेलिग्रामवर मिळवण्यासाठी आमच्या टेलिग्राम चॅनल ला जॉइन करा : https://telegram.me/AapliMayboli


“ आपली मायबोली ” या संकेतस्थळावरील मराठी मधील लिखित माहितीचा मूळ स्त्रोत हा इतर संकेतस्थळे, वर्तमानपत्रे, टी.व्ही. चॅनल्स, इंटरनेट, इ. असणार आहे. आपल्या माय मराठी वाचकांना मराठीमध्ये सहजरीत्या व सुलभपणे चालू घडामोडींची माहिती उपलब्ध व्हावी या साठीचा केलेला हा प्रयत्न आहे. संकेतस्थळावरील कोणत्याही माहितीची “ आपली मायबोली ” टीम पुष्टी करत नाही. त्यामुळे कोणत्याही सूचना, उपाय व इतर गोष्टींची अंमलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञ मंडळींचा सल्ला नक्की घ्या. “ आपली मायबोली ” टीम तुमच्या कोणत्याही गोष्टीस जबाबदार असणार नाही.

Comment here