राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्ज (PBKS) यांच्यात आयपीएल 14 चा चौथा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित झाल्यानंतर पंजाब किंग्ज संघाने 20 षटकांत 221 धावा केल्या आणि राजस्थान रॉयल्ससमोर 222 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरादाखल राजस्थानच्या संघाला 20 षटकांत 7 गडी गमावल्यानंतर 217 धावा करता आल्या. या लक्षाचा पाठलाग करताना राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने शानदार शतक ठोकले, पण त्याचा डाव व्यर्थ ठरला.
सॅमसनचे शतक कामी आले नाही
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने पंजाबच्या २२२ धावांचा पाठलाग करताना शानदार शतक ठोकले. या सामन्यात सॅमसनने 63 चेंडूत 119 धावा केल्या. मात्र, सॅमसनच्या खेळीमुळे राजस्थानला पराभवापासून वाचवता आले नाही आणि शेवटी पंजाबने हा सामना जिंकला. राजस्थानचा संघ 20 षटकांत 7 गडी गमावत 217 धावा करू शकला. या सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर राजस्थानला विजयासाठी 5 धावांची आवश्यकता होती, परंतु सॅमसन झेलबाद झाला. या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनी धावांची लूट केली पण अखेरच्या षटकात अर्शदीप सिंगने पंजाबला वाचवले.
पंजाबची मोठी धावसंख्या
या सामन्यात प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबच्या संघाने राजस्थानसमोर 222 धावांचे मोठे लक्ष्य ठेवले. पंजाबकडून त्यांचा कर्णधार केएल राहुलने ९१ धावांची शानदार खेळी खेळली. राहुलशिवाय दीपक हूडानेही 64 आणि ख्रिस गेलने 40 धावांची खेळी केली. राजस्थानच्या सर्व गोलंदाजांनी धावांची लूट केली. पंजाबच्या संघाने त्यांच्या डावात एकूण 13 षटकार ठोकले. राजस्थानकडून चेतन साकारियाने पदार्पणामध्ये 3 गडी बाद केले.
Comment here